आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनॅशनल जेम्स अँड ज्वेलरी शो:सोने भाववाढीत चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली, 8-10 हजार रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची मागणी सर्वात जास्त

मुंबई / अजय तिवारी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याच्या वाढत्या किमती पाहता सर्वसामान्य ग्राहक चांदीकडे वळला आहे. गेल्या तीन वर्षांत देशात चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीत १००-१५० टक्के वाढ झाली आहे. मुंबईत सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी शोमध्ये ही बाब समोर आली आहे. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत आहे.

शोमध्ये ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काैन्सिलचे सदस्य संजय अग्रवाल यांनी सांगितले की, सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दागिन्यांची मागणी वेगाने वाढत आहे. चांदी दागिने उद्योगाशी संबंधित राहुल मेहरा यांनी सांगितले की, देशात स्मॉल तिकीट साइझ म्हणजे, ८-१० हजार रुपयांच्या चांदीच्या दागिन्याची मागणी सर्वात जास्त आहे.

मुंबईच्या सिल्व्हर एम्पोरियमचे अभिषेक म्हणाले, चांदीच्या दागिन्यांत सोन्याचे समान डिझाइन तयार होत आहेत. दुसरीकडे, गुंतवणूक खर्च अनेक पट कमी होतो. यावर सोन्याचे पॉलिश झाल्यावर सोन्यासारखा लूकही येतो. डेस्टिनेशन वेडिंग्जमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सिल्व्हर ज्वेलरीची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या शोरूमध्ये आता चांदीचे वेगळे काउंटर लावले आहे.

अँटिबॅक्टेरियलमुळे भांड्याची मागणी
जिवाणूविरोधी असल्यामुळे कोविडदरम्यान चांदीच्या भांड्यांची मागणी वाढली आहे. ही विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. या वर्षी सिल्व्हरवेअरच्या मागणीत २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढीचा अंदाज आहे. मुंबईचे सराफा आर.व्ही. अग्रवाल म्हणाले, या वर्षी चांदीची कामगिरी सोन्यापेक्षा चांगली राहण्याचा अंदाज आहे आणि सोन्या-चांदीचे प्रमाण ७० पेक्षा खाली येऊ शकते.

जानेवारीत ६०००% वाढली चांदीची आयात
जानेवारीदरम्यान देशात चांदीची आयात वार्षिक आधारावर ६००० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढली आहे. सोन्याची आयात ४०% पर्यंत घटली आहे. या वर्षी चांदीचा भाव ६५-६६ हजार रु. प्रति किलोदरम्यान राहू शकतो. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनुसार, २०२२ मध्ये जगभरात चांदीच्या दागिन्यांची मागणी ११ टक्के वाढून जवळपास ३१,५२५ टनच्या विक्रमी उंचीवर पोहोचू शकते. चांदीचे बिस्कीट आणि नाण्याची मागणीही १३% वाढून ७ वर्षांत उच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...