आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:26 वर्षे सेवा दिल्यानंतर जून 2022 मध्ये बंद होणार इंटरनेट एक्सप्लोरर

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरनेटचे जग बदलणारा मायक्रोसॉफ्टचा सर्वात यशस्वी, पहिला मोफत ब्राऊझर

मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर वेब ब्राउझर २६ वर्षांनंतर निवृत्त होणार आहे. १५ जून २०२२ नंतर ते इतिहासजमा होईल. बिल गेट्स यांच्या कंपनीने तसे जाहीर केले आहे. एक्सप्लोरर बंद झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट एज त्याची जागा घेईल. इंटरनेट एक्सप्लोरर मायक्रोसॉफ्टचे पहिले यशस्वी ब्राउझर राहिले. त्याव्यतिरिक्त लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला हा पहिला यशस्वी ब्राउझर आहे. त्यामुळे इंटरनेटचे सगळे जगच बदलून टाकले. त्याची सेवा सुरू झाल्यानंतर ते १० वर्षांत ९५ टक्के यूजरपर्यंत पोहोचले होते. परंतु सद्य:स्थितीत त्याचे युजर्स १० टक्के देखील नाहीत.

ही सेवा सुरू झाली तेव्हा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यांनाही काम करताना खूप अडचणी येत. हे ब्राउझर आल्यानंतर कामे सुलभ झाली. त्याची लोकप्रियता वाढली. पोलिसांसाठी ़डेटा काढणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देणे सुलभ झाले. त्यात याची मोठी भूमिका राहिली. नंतर बाजारात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले. त्यानंतर याचा वापर वाढला. सरकारी संस्था, आर्थिक संस्थांमध्ये अजूनही इंटरनेट एक्सप्लोररचा उपयोग केला जात आहे. मायक्रोसॉफ्टने १६ ऑगस्ट १९९५ रोजी त्याची सुरुवात केली होती. त्यानंतर २००२ मध्ये मॉझिला फायरफॉक्स सुरू झाले. त्यामुळे एक्सप्लोररची लोकप्रियता घटली. या दरम्यान एक्सप्लोररचे युजर्स ५० टक्के राहिले होते. त्यानंतर २००८ मध्ये गुगल क्रोम सुरू झाले. त्याने एक्सप्लोररला जणू कालबाह्य केले. जगभरात आज सर्वाधिक युजर्स गुगल क्राेमचे आहेत.

का बंद होणार : : अपटेड केले नाही, भाषांतर, एक्स्टेन्शनही नाही

इंटरनेट एक्सप्लोरर जगभरातील संगणक व लॅपटॉमध्ये असते. परंतु गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्सने सातत्याने अपडेट केले. क्रोममध्ये गुगल ट्रान्सलेशन, अनेक एक्स्टेंशन, अनेक मोड आहेत. एकाच क्लिकमध्ये पूर्ण होतील, अशा अनेक गोष्टी आहेत. एक्सप्लोररमध्ये या गोष्टींचा अभाव आहे.

67% क्रोम तर 2.5% ओपेरा ब्राउझर युजर

गूगल क्रोम 67.63 मोजिला फायरफॉक्स10.97 इंटरनेट एक्सप्लोरर7.02 अॅपल सफारी5.13 माइक्रोसॉफ्ट एज4.24 ओपेरा2.48

बातम्या आणखी आहेत...