आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअधिकांश मोठ्या कंपन्या एकतर नवोदितांना कॉलेज कँपसमधून निवड करतात अथवा त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांची निवड होते. अशात ज्या विद्यार्थ्यांची निवड होत नाही अशांना नोकरी शोधण्यात खूप अडचणींचा समाना करावा लागतो. एआयसीटीईचे अंक सांगतात की, अकॅडेमिक सेशन २०२०-२१ मध्ये १६ लाखांहून अधिक विद्यार्थींनी इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजी व विविध प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश घेतला.
परंतु या वर्षी जवळपास साडेसहा लाख विद्यार्थ्यांंना नोकऱ्या मिळाल्या. अशावेळी जो नोकरी मिळण्यास सहाय्यभूत ठरेल, असे जॉब स्किल्स वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी इंटर्नशिपचा पर्याय निवडतात. यामुळे वर्क एक्सपोजरसह प्रोफेशनल लर्निंगही मिळते. इथे काही मोठ्या कंपन्यांच्या इंटर्नशिप प्रोग्राम्सबाबत सांगितले जात आहे, जे महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसाठी उपयोगी आहे.
10 ते 16 आठवड्यांसाठी असते नासात इंटर्नशिप
नासामध्ये इंटर्नशिप आणि फेलोशिप प्रोग्राम्ससाठी दहावी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपसाठी नासामध्ये तीन सेशन असतात. इंटर्नशिप प्रोग्राम १० ते १६ आठवड्यांचा असतो, जो जानेवारी ते डिसेंबरपर्यंत तीन भागात पूर्ण होतो. अधिक माहितीसाठी- https:/intern.nasa.gov
कंटेंट रायटिंग व सेल्स करिअरसाठी अॅमेझॉनमध्ये
अॅमेझॉन इंटर्न अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत, जसे की, कस्टमर-फेसिंग कंटेंट रायटिंग, प्राइम प्रायसिंग लॉन्च, वेबसाइटसाठी नवे फिचर तयार करणे आदी. इथे ग्रॅजुएट रिसर्च कॅरिअर्स, फायनांन्स लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, करीअर इन सेल्स आदि इंटर्नशिप प्रोगाम्स ऑफर केले जातात. https:/www.amazon.jobs/en/teams/internships-for-students
यूजी-पीजी, एमबीए साठी गुगल लर्निंग
यूजी, पीजी व एमबीए विद्यार्थ्यांंसाठी गुगल अनेक इंटर्नशिप प्रोग्राम्स ऑफर करताे. साॅफ्टवेअर, मेकॅनिकल, हार्डवेअर इंजीनियरिंग, लीगल, युजर एक्सपीरियन्स, एमबीए, असोसिएट प्रॉडक्ट मॅनेजमेंटशी जोडले गेलेले तरुण गुगलच्या या इंटर्नशिप प्रोग्राम्ससाठी अर्ज करू शकतात. सध्याला इथे अनेक इंटर्नशिप प्रोग्राम्ससाठी भरती सुरू आहे. या संकेतस्थळावर https:/careers.google.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.