आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य एक संपत्ती आहे, त्यालाही आर्थिक सुरक्षिततेची गरज आहे. फ्यूचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ यांनी मुकुल शास्त्री यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, एका वर्षात आरोग्य विमा प्रीमियम २५% वाढला. कोविडने विम्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला. या संवादातील ठळक मुद्दे...
देशात विमा संरक्षण अंतर कोणत्या स्तरावर आहे? २०२०पर्यंत भारतात जीवनतर विमा प्रवेश १% होता. त्या तुलनेत अमेरिका, जर्मनी आणि जपान सारख्या देशांमध्ये हा आकडा ९.०%, ४.०% आणि २.४% होता. जागतिक स्तरावर विमा प्रवेश ४.१% होता. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारतातील विम्याचा प्रवेश ४.२%, जीवन विमा ३.२% आणि नॉन-लाइफ इन्शुरन्स १.०% पर्यंत वाढला. विकसित देश आणि भारतात विम्याविषयी लोक काय विचार करतात ? भारतात विकसित देशांच्या तुलनेत विम्याविषयी कमी जागरूकता असणे, मोठे कारण आहे. भारतात २०२०पर्यंत नॉन-लाइफ इन्शुरन्सचा प्रति व्यक्ति प्रीमियम आणि लोकसंख्येचे प्रमाण १,५६६ रुपये होते, दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन आणि जपान सारख्या देशात क्रमश: ४.७४ लाख, १.७८ लाख आणि ७८,४१० होते. या आर्थिक वर्षात तुम्हाला किती वाढ अपेक्षित आहे? एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत नॉन-लाइफ इन्शुरन्ससाठी नवीन पॉलिसी प्रीमियममध्ये ११.१% वाढ झाली आहे. या वर्षी मे महिन्यात या प्रकरणात २४.१५% वाढ दिसून आली. यावरुन देशाच्या विमा उद्योगात अल्प ते मध्यम कालावधीत मजबूत वाढ होईल, असे दिसते. फ्युचर जनरलीच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये गेल्या आर्थिक वर्षात १९% वाढ झाली. आम्हाला २०२२-२३ मध्ये २०% वाढ अपेक्षित आहे. फ्यूचर जनराली आता कोणत्या रणनीतीवर काम करत आहे? कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स क्लेम ग्राहकाला तणावाच्या काळात रोख रकमेची व्यवस्था करण्याच्या त्रासातून मुक्त करतो. आम्ही देशभरातील ५५० हून अधिक शहरांमध्ये टाय-अपवर लक्ष केंद्रित केले आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आम्ही ७,५०० हून अधिक कॅशलेस हॉस्पिटल्सशी टाय-अप केले आहेत. २०२१-२२ मध्ये कंपनीने किती दावे निकाली काढले? फ्यूचर जनरालीने २०२१-२२ मध्ये ४,६७,६६१ पेक्षा जास्त दावे निकाली काढले. एकूण सेटलमेंट रेशो ९३% आहे. दाव्याचे प्रमाण ६९% आहे. ‘इन-हाऊस क्लेम्स मॅनेजमेंट’ या क्षेत्रात, आम्ही मूल्यवर्धित नसलेल्या क्रियाकलापांना ओळखण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.