आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जर चीनसह अन्य काेणतेही देश आपल्या देशाच्या विराेधात काम करत असतील तर त्यांचा माल आपण का वापरावा ? मी स्वत:च चीनमध्ये उत्पादन झालेल्या एकाही साहित्याचा वापर करणार नाही. चिनी मालाच्या विराेधात देशात सुरू झालेल्या माेहिमेला पाठिंबा देताना प्रसिद्ध उद्याेगपती संजय दालमिया यांनी हे मत व्यक्त केले आहे.
दैनिक दिव्य मराठी नेटवर्कशी झालेल्या एका विशेष चर्चेत दालमिया ग्रुप आॅफ कंपनीजचे अध्यक्ष म्हणाले की, चीनने एकाच वेळी अनेक चुका केल्या असून त्यामुळे आपल्या देशाला त्रास हाेत आहे. काेणताही देश जाे आपल्या देशाच्या विराेधात काम करताे त्यांचा माल आपण का वापरावा ? आपल्या चीनबराेबरच पाकिस्तानच्या मालाचा वापरही तातडीने बंद करायला हवा. दालमिया म्हणाले, जर भारताच्या विराेधात पाऊल उचलले तर त्यांना भारतासारखी माेठी बाजारपेठ गमवावी लागेल हा संदेश जगभरात पाेहोचेल. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या आधी आपण इंग्रजांच्या मालावर बहिष्कार घालून त्यांना गुडघे टेकवायला लावले हाेते. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे.
चीनवरील बहिष्कारामुळे गरजेच्या मालाचा तुटवडा जाणवेल या प्रश्नावर ते म्हणाले, सुरुवातीला १००% गरज भागवू शकणार नाही, परंतु ७० %गरजा पूर्ण करता येतील. काही उद्याेगांना हे अवलंबित्व कमी करण्यासाठी विलंब लागू शकताे, पण ग्राहक म्हणून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकू शकताे.
राज्यसभेचे खासदारपद भूषवलेले उद्याेगपती दालमिया पुढे म्हणाले, मी स्वत: चीनमध्ये उत्पादन झालेल्या मालाचा वापर करणार नाही. माझी विनंती आहे की, प्रसार माध्यमांनी देखील चीनमध्ये उत्पादन झालेल्या वस्तूंची माहिती प्रकाशित करावी. ज्यामुळे चीनमध्ये काेणत्या प्रकारची उत्पादने हाेतात याची मला व सामान्य जनतेला माहिती हाेऊ शकेल.
लडाखचे शिक्षण तज्ज्ञ वांगचूक यांनी सुरू केली माेहीम
चीनला धडा शिकवण्यासाठी गेल्या आठवड्यात शिक्षणतज्ञ व इनाेव्हेटर साेनम वांगचुक यांनी देशभरात मेड इन चायना मालावर बहिष्कार घालण्यासाठी माेहीम छेडली आहे. चिनी मालावर इतका माेठ्या प्रमाणावर बहिष्कार घाला की तेथील अर्थव्यवस्था काेलमडून जाईल, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या माेहिमेला पाठिंबा मिळत आहे. त्यांनी एका आठवड्यात चिनी सॉफ्टवेअर आणि एका वर्षात चिनी हार्डवेअरच्या बहिष्काराचा प्रस्ताव ठेवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.