आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Invest In Companies With More Women At The Helm; Stocks Tend To Outperform Benchmarks

अशा कंपन्यांत गुंतवणूक करा, ज्यांच्या नेतृत्वात अधिक महिला:समभाग बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा देताहेत

इशिका मुखर्जी आणि शेरिल तियान टोंग ली | मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया खंडातील शेअर बाजारात विशेष कल पाहायला मिळत आहे. बाेफा सेक्युरिटीजच्या अहवालानुसार ज्या कंपन्यांत महिला व्यवस्थापकांची संख्या अधिक आहे, त्यांचे शेअर बेचमार्कच्या (जसे सेन्सेक्स) तुलनेत अधिक परतावा देत आहेत. मंगळवारच्या अभ्यास अहवालानुसार, एमएससीआय एशिया-पॅसिफिक निर्देशांकात समाविष्ट असलेल्या अशा समभागांचा पाच वर्षांचा सरासरी परतावा बेंचमार्कपेक्षा ४ टक्के जास्त होता. त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. अशा शेअर्सनी समान कालावधीत ज्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात सर्वात कमी महिला आहेत, त्यांच्या तुलनेत २६ टक्के अधिक परतावा दिला. टक्केवारी बिंदू म्हणजे दोन भिन्न टक्केवारी संख्यांमधील फरक असतो. म्हणजे ४५% आणि २५% का पर्सेंटेज पॉइंट २० असेल.

बोफाच्या संशोधन अहवाल सन २०१० मधील शेअर्सच्या परताव्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार नेतृत्वातील (लीडरशीप) विविधता कंपनीच्या यशात मोठी भूमिका बजावते. मॅकिंजी अँड कंपनीच्या एका अहवालात म्हटले की, ज्या कंपन्यांमध्ये किमान ३० टक्के महिला अधिकारी आहेत, त्यांची कामगिरी लीडरशीपमध्ये महिलांची भागीदारी कमी असलेल्या कंपनीच्या तुलनेत सरस राहण्याची अधिक शक्यता असते. एवढेच नव्हे तर २०२१ मध्ये आलेला क्रेडिट सुइझ ग्रुपच्या ‘डायव्हर्सिटी प्रीमियम’ या अभ्यासात म्हटले की, जास्त लिंग विविधता असलेले बोर्ड आणि एक्झिक्युटिव्ह लीडरशिपचा थेट संबंध कंपनी आणि शेअरच्या चांगल्या कामगिरीशी असतो. अशा कंपन्यांमध्ये बहुतांश निर्णय दीर्घकालीन परिस्थितीचा अंदाज घेऊनच घेतले जाण्याची अधिक शक्यता असते. महिला यासाठी योग्य मानल्या जातात. दरम्यान, बोफाच्या विश्लेषकांनी अहवालात म्हटले, आकडेवारीवरून स्पष्ट होते की, ज्या कॉर्पोरेट्सच्या व्यवस्थापनामध्ये उच्च स्तरावर लिंग वैविध्य हे त्यांच्याकडे नेतृत्व अनुभव, ज्ञान आणि कौशल्यांची विविधता आहे.

अमेरिकी कॉर्पोरेट्सवर महिलांची संख्या वाढवण्याचा दबाव ब्लॅकरॉक इंकसह अमेरिकेतील मोठ्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि स्ट्रीट ग्लोबल अॅडव्हायझर्सनी कॉर्पाेरेटवर त्यांच्या बोर्डात महिलांची संख्या वाढवण्यासाठी दबाव आणला आहे. जास्तीत जास्त महिलांना व्यवस्थापनात वरिष्ठ पदांवर नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या एमएससीआयच्या अध्ययनानुसार २०२२ मध्ये एमएससीआय एसी वर्ल्ड इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या बोर्डावरील महिला सदस्यांची संख्या २४% च्या वर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...