आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडा:बाजाराचा कल कळला नाही तर मल्टी अॅसेट फंडात करा गंुतवणूक

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिकरीत्या एक खास कल दिसून येतो. जेव्हा मालमत्ता वर्गाचे मूल्य जास्त असते तेव्हा त्यात चढ-उतार होऊ लागतात. या संदर्भात, इक्विटीसारख्या कोणत्याही एका मालमत्ता वर्गावर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही. त्याच्या जागी अशा मालमत्तेत गुंतवणूक करावी ज्यात इक्विटी, डेट, गोल्ड, रिअल इस्टेट आणि ग्लोबल फंड्सचे संतुलित संयोजन असावे, मल्टी अॅसेट फंड ही गरज पूर्ण करतात. अनेक मालमत्ता वर्गात एकदाच गुंतवणूक केली जाऊ शकते, यातमालमत्ता वर्गात वाढलेला धोका कमी करण्याची पद्धतीदेखील आहे. मल्टी अॅसेट स्ट्रॅटेजी गुंतवणूकदाराला आवश्यकतेनुसार एका मालमत्तेवरून दुसऱ्या मालमत्तेवर स्विच करण्याची लवचिकता देते. अशा प्रकारे, गुंतवणूकदार प्रत्येक मालमत्तेमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेण्यास सक्षम आहे.

प्रत्येक मालमत्ता खास }इक्विटी भांडवली वाढीद्वारे गुंतवणुकीचे मूल्य वेगाने वाढवते.

}डेट पोर्टफोलिओमध्ये अस्थिरतेचा धोका कमी करते.

}गोल्ड महागाईच्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करते. }रीट्स/इन्विट परतावा वाढवण्याच्या धोरणाचा हा महत्त्वाचा भाग आहे

पाच वर्षांचा सरासरी परतावा 17.5% फंडाचे नाव वार्षिक रिटर्न क्वांट मल्टी अॅसेट फंड 25.20% आयसीआयसीआय प्रु. मल्टी अॅसेट फंड 18.63% एचडीएफसी मल्टी अॅसेट फंड 13.11% अॅक्सिस ट्रिपल अॅडव्हांटेज फंड 10.51% एसबीआय मल्टी अॅसेट अलो. फंड 10.40% यूटीआय मल्टी अॅसेट फंड 9.12%

तीनपेक्षा जास्त मालमत्तेत किमान १०% गुंतवणूक मल्टी अॅसेटमध्ये तीन किंवा जास्त मालमत्ता वर्ग असतता. प्रत्येकात कमीत कमी १० टक्के गुंतवणूक केली जाते. मात्र बाजाराची स्थिती आणि इतर घटनाक्रम पाहता फंड अॅसेट वाटप बदलत राहते. हा दृष्टीकोन गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेण्यास सक्षम आहेत.

इक्विटीत सर्वात जास्त गंुतवणूक मल्टी अॅसेट फंड इक्विटीमध्ये १०-८०% गुंतवणूक करतात. हा शेअर बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. १०-३५% कर्जात, १०-३०% सोन्यात आणि ०-१०% रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट (रीट्स) किंवा पायाभूत गुंतवणूक ट्रस्ट (इन्विट्स) मध्ये गुंतवले जाते.

बातम्या आणखी आहेत...