आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Investment In Mutual Funds At Record Level |15.39 Lakh SIP Accounts Closed In December; 41% Higher Than Average | Investment In Mutual Funds |

म्युच्युअल फंडात गुंतवणूक विक्रमी पातळीवर:डिसेंबरमध्ये 15.39 लाख एसआयपी खाती बंद; सरासरीपेक्षा 41% जास्त

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक विक्रमी पातळीवर गेल्याने नवा कल समोर आला. एम्फीच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये १५.३९ लाख एसआयपी खाती बंद झाली. सहा महिन्यांची सरासरी १०.९ लाखांपेक्षा ४१% जास्त आहे. मात्र डिसेंबर उघडलेल्या एसआयपी खात्यांची संख्या २३.२४ लाख होती. मात्र ती सहा महिन्यांची सरासरीपेक्षा (२०.२० लाख) १५% च जास्त आहे. गेल्या काही महिन्यांत एसआयपीतून पैसे काढणे वाढले आaहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानुसार, गेल्या वर्षी जुलै- डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी एसआयपी खात्यातून ४०,००० कोटी रुपये काढले. हे त्या आधीच्या सहामाहीच्या तुलनेत ३३% जास्त आहे. जानेवारी– जूनदरम्यान एसआयपीतून ३०,००० कोटी रुपये काढण्यात आले.

एसआयपी बंद होणे, काढण्याची प्रमुख कारणे 1. व्याजदर वाढल्यावर म्युच्युअल फंडातून पैसे काढणे सामान्यत: वाढते. 2. बँक ठेवीचे दर वाढल्याने आता एफडीवर जास्त परतावा मिळत आहे. 3. बाँड वा डेट इन्स्ट्रूमेंट्समध्ये गुंतवणुकीतून आधीपेक्षा जास्त उत्पन्न. 4. सणांच्या काळात खर्च, मालमत्ता खरेदीसाठी नफावसुली. 5. परतावा एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर येण्याची प्रतिक्रिया.

जानेवारी-डिसेंबरमध्ये १.२१ कोटी एसआयपी खाती उघडली एम्फीचे सीईओ एन. एस. व्यंकटेश यांच्यानुसार, खाती बंद होण्याचा आकडा वाढलेला नाही. डिसेंबरमध्ये जी एसआयपी खाती मुदत पूर्ण होणे किंवा मध्येच बंद झाली. एसआयपी खात्यांच्या अवघी २.५% आहे.

अपेक्षेनुसार परतावा न मिळाल्याने पैसे काढले ^जेव्हा बाजार चांगली कामगिरी करतो तेव्हा मोठ्या संख्येने नवीन गुंतवणूकदार एसआयपी सुरू करतात. अपेक्षेप्रमाणे परतावा न मिळाल्यास काही गुंतवणूकदार बाहेर पडतात. परताव्याची कोविड पूर्व रॅलीशी तुलना होऊ शकत नाही. -स्वरूप मोहंती, सीईओ, मिराए

बातम्या आणखी आहेत...