आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Investment Mantra | Aim For These Five Rules While Building A Portfolio Of Shares

गुंतवणूक मंत्र:शेअर्सचे पोर्टफोलियो बनवताना या पाच नियमांकडे लक्ष्य द्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर्सचा पोर्टफोलियो बनवताना या पाच नियमांकडे लक्ष द्या. शेअर्सच्या पोर्टफोलियोला डायरव्हर्सीफाय करणे गुंतवणुकीचे एक चंागले धोरण असते. यामुळे पोर्टफोलियो जोखीम कमी होते. शिवाय अचानक उद्भवणारा धोका आणि कंपनीशी असलेली जोखीम कमी करते. परंतु पोर्टफोलियोमध्ये विविधता आणल्याने गुंतवणुकीवरील परतावा जास्त प्रमाणात कमी होतो.

कोणत्याही शेअर किंवा क्षेत्रात एका मर्यादेनंतर गंुतवणूक वाढवणे धोकादायक असते. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे गंुतवणुकीचे एक उत्कृष्ट धोरण आहे. पोर्टफोलिओमध्ये ५०-१०० स्टॉक्स ठेवण्याएवेजी जर १५-२० हाय-क्वालिटी स्टॉक्स ठेवले तर त्यावर नजर ठेवणे जास्त चांगले होईल. सरासरी वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये २०-३० स्टॉक्स असू शकतात. तथापि, गुंतवणुकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये किती स्टॉक्स असावेत यावर कोणतेही निश्चित मापदंड नाही कारण प्रत्येक व्यक्तीचे गुंतवणुकीचे निर्णय त्याच्या/तिची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता आणि सध्याच्या पोर्टफोलिओ स्थितीवर अवलंबून असतात.

1. गुंतवणुकीचा निर्णय सल्ल्यावर घेऊ नये खरं तर, तुम्हाला जी कंपनी किंवा क्षेत्राचे ज्ञान असेल त्याचा गुंतवणूक करणे शिका. शेअर बाजारात सुमारे ४००० कंपन्यांच्या शेअर्समध्ये सक्रिय ट्रेडिंग असते. तुम्ही त्याच कंपनीत गंुतवणूक करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे, सोशल मीडियाच्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार निवडू नका.

2.बचत शेअर्समध्ये गुंतवणूक करा अतिरिक्त रक्कम पोर्टफोलियोमध्येच गुंतवणूक करा. प्रत्येक महिन्यात नवीन स्टॉक विकत घेण्याची गरज नाही. जोपर्यंत वर्तमानातील स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली नसेल.

3.लक्ष द्या, तुम्ही म्युच्युअल फंड नाहीत म्युच्युअल फंड कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ६०-७० स्टॉक्स असायला हवेत. पण तुम्ही म्युच्युअल फंड नाहीत. किरकोळ गुंतवणूकदाराला अनेक कंपन्यांचे संशोधन आणि मागोवा घेणे शक्य नसते.

4.पोर्टफोलियोवर कर महत्त्वपूर्ण नाही पोर्टफोलिओमध्ये स्टॉकपेक्षा जास्त महत्त्वाचे तुमचा पोर्टफोलिओ डायर्व्हसिफाय असायला हवा. पोर्टफोलिओ जर १ कोटी रुपयापेक्षा जास्त असेल तर २०-२५ स्टॉक ठेवायला हवेत.

5.शेअर्सएेवजी सेक्टर्सवर शेअर्स करा पोर्टफोलिओमध्ये शेअर्सच्याऐवजी क्षेत्रावर लक्ष द्या. एकाच क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्या पोर्टफोलिओचा धोका वाढू शकतो, हे लक्षात ठेवा.

बातम्या आणखी आहेत...