आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Investor Assets Fell By Rs 6.27 Lakh Crore, An Increase Of 40 Bps In Policy Rates

आश्चर्याचा धक्का:गुंतवणूकदारांची मालमत्ता 6.27 लाख कोटींनी घटली, धोरणात्मक दरात 40 बीपीएसने वाढ

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँकेने आश्चर्याचा धक्का देताना धोरणात्मक दरात ४० बीपीएसने वाढ केल्‍याने भांडवल बाजारात तुफान विक्रीचा मारा होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,३०६.९६ अंकांनी गडगडत ५५,६६९.०३ अंकांवर स्थिरावला. दिवसभरात तो १,४७४.३९ अंकांनी घसरून ५५,५०१.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. विक्रीच्या माऱ्यामुळे गुंतवणूकदारांची श्रीमंती ६.२७ लाख कोटी रुपयांनी आटली. घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील नाेंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल ६,२७,३५९.७२ कोटी रुपयांनी घसरून २,५९,६०,८५२.४४ कोटी रुपये झाले.

रिझर्व्ह बँकेने अलीकडच्या काही महिन्यांत उद्दिष्टापेक्षा अधिक जिद्दीने राहिलेल्या महागाईला आळा घालण्याच्या प्रयत्नात बुधवारी व्याजदरात आश्चर्यकारकरीत्या ४० बेसिस पाॅइंटने वाढ केल्यानंतर गृह, वाहन आणि इतर कर्जांचा ईएमआय वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते ताे रेपाे दर ४ टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवरून ४.४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची ऑगस्ट २०१८ नंतरची पहिलीच घटना आहे.

कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे ​​इक्विटी रिसर्च (रिटेल) श्रीकांत चौहान म्हणाले, “अमेरिकेत फेडच्या बैठकीपूर्वी रिझर्व्ह बँकेने अचानक व्याजदरात वाढ करून भारतीय भांडवल बाजारात खळबळ उडवून दिली. त्यामुळेच सेन्सेक्समध्ये माेठी घसरण झाली.

बातम्या आणखी आहेत...