आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेअर्सच्या बाबतीत भारतीय गुंतवणूकदारांची आवड बदलली आहे. आता त्यांनी आर्थिक, औद्योगिक आणि मालमत्ता शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. दुसरीकडे आयटी, फार्मा आणि ऊर्जा शेअर्समध्ये गुंतवणूक कमी होत आहे. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी जेफरीजच्या एका अहवालानुसार, २०२१ पर्यंत जवळपास याच्या उलट स्थिती होती. अहवालानुसार, भारतीय गुंतवणूकदारांचा मॉडेल पोर्टफोलिओ देशांतर्गत कंपन्यांच्या बाजूने आहे. त्यांचे म्हणणे आहे की, वाढता खासगी भांडवली खर्च आणि गृहनिर्माण चक्रामुळे प्रतिकूल स्थितीतही वृद्धीला सपोर्ट मिळणे सुरूच राहील. या विश्वासामुळे भारतातील देशांतर्गत गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसा लावत आहेत.
बँकिंग, औद्योगिक, गृहनिर्माण शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक एलकेपी सेक्युरिटीजचे रिसर्च हेड एस. रंगनाथन यांच्या मते, गुंतवणुकदारांनी सध्या पाच क्षेत्रांतील शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे-
१. बँकिंग, आर्थिक : निफ्टीत या क्षेत्राचे वेटेज ३५% आहे. १० वर्षांच्या मंदीनंतर सरकारी बँकांची स्थिती सुधारली आहे. २. औद्योगिक, उत्पादन : सरकारने बजेटमध्ये वाढ केली आहे. याशिवाय सरकारी भांडवली खर्च वाढल्यामुळेही कंपन्यांना फायदा होईल. ३. अभियांत्रिकी : अलीकडे या क्षेत्राची झपाट्याने प्रगती झाली. निर्यातीत भागीदारी वाढत आहे. बांधकामे वाढल्यानेही या क्षेत्राला फायदा मिळेल. ४. गृहनिर्माण : आगामी काही वर्षांपर्यंत या क्षेत्रातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. कोविडनंतर लोक घर खरेदीला प्राधान्य देत आहेत. ५. हॉटेल : सर्वच देशांमध्ये पर्यटन वाढले. याचा सर्वाधिक फायदा हॉटेल उद्योगाला होईल.
{एव्हिएशन, कन्झ्युमर शेअर्स टाळा : लोक महागाईमुळे गरजेच्याच वस्तू खरेदी करत आहेत. अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळत आहेत. एव्हिएशन क्षेत्रातील कंपन्यांना नफा मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.
२०२१ पासून बदलला भारतीय बाजाराचा कल गेल्या १० वर्षांत भारतीय बाजाराने इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत ६१% मूल्यांकनावर व्यापार केला. मात्र, २०२१ पासून भारतीय बाजारांनी इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये हे बाजार १०१% प्रीमियरवर पोहोचले. तेव्हापासून यात घसरण आली, पण ते आता वधारताहेत. यामुळे अत्यंत मजबूत स्थिती विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची होल्डिंग विक्रमी निचांकी पातळीच्या जवळ असताना ही स्थिती आहे. म्हणजेच ही तेजी देशांतर्गत गुंतवणूकदारांमुळे आहे. जेफरीजचा रिलेटिव्ह परफॉर्मन्स ट्रॅकरही भविष्यात प्रतिस्पर्धी बाजारांच्या तुलनेत उत्तम कामगिरीचा संकेत देत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.