आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पेपर गोल्ड:जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केले 4,131 किलाे साॅव्हरिन गोल्ड बाँड

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय गुंतवणूकदारांनी दाखवला पेपर गाेल्डवर विश्वास
  • या वर्षात आतापर्यंत याेजनेत १०.८ टन साेन्याच्या समतूल्य झाली बाँड विक्री
Advertisement
Advertisement

साेन्याच्या किमती विक्रमी पातळीवर असूनही या माैल्यवान धातुवरील गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. चढ- उताराच्या काळात साेन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानून जुलैमध्ये भारतीय गुंतवणूकदारांनी ४,१३१ किलाेच्या विक्रमी प्रमाणात साॅव्हरिन गाेल्ड बाँड (एसजीबी) खरेदी केली आहे. ही गेल्या चार वर्षांत विक्री झालेल्या एकूण १०.८ टन साेन्याच्या जवळपास ४० टक्के आहे. या आधी जूनमध्ये याेजनेच्या तिसऱ्या मालिकेत २,३८८ किलाे साेन्याच्या समतूल्य बाँड विक्री झाली हाेती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार जुलै एसजीबी इश्यूमध्ये सरकारने २,००४ काेटी रुपयांची राेखे विक्री केली. नाेव्हेंबर २०१५ मध्ये याेजना जाहीर झाल्यानंतर आतापर्यंतचे हे विक्रीचे प्रमाण आणि इश्यूमध्ये जमा झालेली रक्कम यासाठी जुलै महिना सर्वाेत्तम ठरला आहे. या वर्षीच्या पहिल्यास सहामाहीत सरकारने १०.८ टनपेक्षा जास्त गाेल्ड बांॅडची विक्री करून एकूण ५.११२ काेटी रुपयांची रक्कम संकलित केली आहे. ही रक्कम एप्रिल- जून २०२० च्या साेने आयातीच्या जवळपास समतुल्य आहे.

या अगाेदर २०१६-१७ या वर्षात सरकारने सर्वाधिक ३,४८१ काेटी रक्कम गाेल्ड बांॅडद्वारे संकलित केली. परंतु सरकारने त्या वर्षात ११.४ टन मूल्याची राेखे विक्री केली हाेती. बंॅकबाजार डाॅटकाॅमचे सीईआे अदिल शेट्टी म्हणाले, महामारीमुळे लाेकांना साेन्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केले.

२०१६-१७ चा विक्रम मोडलातेव्हा ११ टनांपेक्षा जास्त सोने विकून ३५०० कोटी जमा

जुलै महिन्यातील रोख्याच्या त्वरित विक्रीमुळे एसजीबीचे सर्व विक्रम मोडले आहेत. याआधी यशस्वी वर्ष २०१६-१७ होते. तेव्हा संपूर्ण वर्षात सरकारने ११,२८८ किलो सोने विकून ३४८१ कोटी कमावले होते. दुसरीकडे, या वेळी १०८३६ किलो सोने विकून सरकारने ५११२ कोटी जमा केले आहेत. या वर्षी सध्या एसजीबीला दोन मालिका आणखी येणार आहेत. या वर्षी एसजीबीमध्ये १५ टनांपेक्षा जास्त सोने विकू शकते.

संधी चुकलेल्यांनी काय करावे

शेट्टी म्हणाले, ज्यांची संधी चुकली त्यांनी ३-७ आॅगस्ट २०२० वा ३१ आॅगस्ट ४ सप्टें. २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी. तातडीने एसजीबी खरेदी करणारे आॅनलाइन ट्रेडिंग प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून दुय्यम बाजारपेठेत बाेली लावून जुन्या एसजीबी विकणाऱ्या गुंतवणूकदारांकडून खरेदी करू शकतात. साव्हरिन गाेल्ड बाँडची या वर्षातील कामगिरी

Advertisement
0