आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Investors Jumped On The Bandwagon With The Name 'Oxygen', Then Realized That It Was A Finance Company

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:नावात ‘ऑक्सिजन’ असलेल्या कंपनीवर गुंतवणूकदारांच्या उड्या, नंतर उमगले की ही तर फायनान्स कंपनी; लाेअर सर्किटची नामुष्की

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नावातील गफलतीमुळे बॉम्बे ऑक्सिजनचा शेअर महिनाभरात 133% वधारला

देशात कोरोनाचे थैमान सुरू असताना ऑक्सिजनची मागणीही वेगाने वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारात ऑक्सिजन नाव असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर कंपनीचा ऑक्सिजनशी काही संबंध आहे की नाही, हेही न पाहता गुंतवणूकदार पैसे गुंतवत आहेत.

असाच किस्सा बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीसोबत घडला. सोमवारी बाजार उघडताच या कंपनीचा शेअर बीएसईच्या अपर सर्किटची मर्यादा २४,५७४.८५ रुपयांवर पोहोचला. मंगळवारी गुंतवणूकदारांना कंपनीचे ऑक्सिजन निर्मितीच्या व्यवसायाशी काहीही देणेघेणे नाही हे कळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनी बुडी मरली. शेवटी लोअर सर्किट लागून शेअर २३,३४६.१५ रुपयांवर आला. हा शेअर बीएसईच्या देखरेखीत असल्याने त्यात कमाल नफा वा नुकसानीची मर्यादा ५% आहे. महिनाभराच्या आतच ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवत शेअर १३३% वधारला. बॉम्बे ऑक्सिजनच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांत उसळी आली आहे. त्याचे मूल्य मार्चअखेरीच्या १०,००० रुपयांवरून दुप्पट झाले आहे. तथापि, कंपनीच्या वेबसाइटवर स्पष्ट म्हटले आहे की, कंपनीची स्थापना ३ ऑक्टोबर १९६० बॉम्बे ऑक्सिजन कॉर्पोरेशन लि.च्या रूपात झाली होती. मात्र ३ आॅक्टोबर २०१८ पासून कंपनीने नाव बदलून बॉम्बे इन्व्हेस्टमेंट्स लि. केले होते. कंपनीने म्हटले की त्यांचा मुख्य व्यवसाय औद्योगिक गॅसचे उत्पादन व पुरवठा होता. तो त्यांनी ऑगस्ट २०१९ पासून पूर्णपणे बंद केला.

जाणकारांनुसार कंपनीच्या वेबसाइटवरील विरोधाभासी माहितीने गफलत झाली. कंपनी आता ऑक्सिजनचा व्यवसाय करत नाही. मात्र उत्पादने म्हणून आताही ऑक्सिजन व इतर औद्योगिक वायुंचा उल्लेख आहे. तथापि, कंपनीला बीएसईत गैर-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हटले आहे. ३१ डिसेंबर २०२० ला संपलेल्या वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न ३३.७९ कोटी रुपये आणि नफा ३१.६९ कोटी रुपये होता.

आता पाहा... लोकांच्या कशा उड्या पडतात ते!
केवळ बॉम्बे ऑक्सिजनच्या नावात लोकांची गफलत झाली नाही. नावात मागेपुढे ऑक्सिजन शब्द असलेल्या अनेक कंपन्या आहेत. त्या औद्योगिक वायुंचे उत्पादन करतात. सध्या नॅशनल ऑक्सिजन लिमिटेड,भगवती ऑक्सिजन लिमिटेड आणि गगन गॅसेससह अनेक कंपन्यांच्या नफ्यात उसळी आली आहे.

बातम्या आणखी आहेत...