आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Investors Poor Rs 4.47 Lakh Crore, High Inflation Is The Only Reason For Market Collapse

दिव्य मराठी विशेष:गुंतवणूकदार 4.47 लाख कोटींनी गरीब, तीव्र महागाई हेच बाजार कोसळण्याचे एकमेव कारण

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक शेअर बाजारातील नरमाईमुळे भांडवल बाजारात तुफान झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स ८६६.६५ अंकांनी गडगडला आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदार साैदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ४.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गरीब झाले. दुसऱ्या बाजूला मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल ४,४७,१७२.५७ कोटी रुपयांनी घसरले.

महागाईने पुन्हा वर काढलेले डाेके आणि त्याचे सध्याचे तीव्र स्वरूप हेच एकमेव कारण जगभरातील शेअर बाजार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरले. आर्थिक मंदीला चालना न देता मध्यवर्ती बँका महागाईला वेसण घालू शकणार का, हा प्रश्न गुंतवणूकदारांंना पडला आहे. त्या चिंतेतूनच जगभरातील बाजार गडगडले. त्यातच जागतिक बाजारातील नरमाई, भांडवल बाजारातून सातत्याने बाहेर जात असलेला परकीय निधी आणि कच्च्या तेलाच्या किमती या नकारात्मक गाेष्टींची भरही त्यात पडली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी २,०७४.७४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. आशियामध्ये हाँगकाँग, शांघाय, कोरिया शेअर बाजार खालच्या पातळीवर बंद झाले. दुपारच्या सत्रानंतर युराेप शेअर बाजारातही नकारात्मक वातावरण होते. गुरुवारी रात्री अमेरिकेच्या शेअर बाजारात लक्षणीय घसण झाली.

बातम्या आणखी आहेत...