आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Investors Withdrew Rs 14,000 Crore From Mutual Funds In August; Money Withdrawn From Three Categories Of Funds Equity, Debt And Hybrid

धारणा बिघडली:गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातून ऑगस्टमध्ये काढले 14 हजार कोटी; इक्विटी, डेट आणि हायब्रिड तीन श्रेणींच्या फंडातून काढले पैसे

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट महिन्यात अॅसेट मॅनेजमेंट फंड आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंडांशिवाय अन्य सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडांत घसरण पाहायला मिळाली आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची संघटना अॅम्फीकडून बुधवारी जारी केलेल्या आकड्यांतून ही माहिती समोर आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांची आवडीची श्रेणी इक्विटी फंडात ऑगस्टमध्ये सलग पाच महिने फंड इन्फ्लोमध्ये घट नोंदली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणूकदारांनी या श्रेणीतून पैसा काढला. यामध्येही मल्टी आणि लार्ज कॅप फंड्समध्ये मोठ्या प्रमाणात फंडातून पैसा काढला. गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये इक्विटी फंडात एकूण १४,५५८.२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर १८,५५७.८२ कोटी रुपये काढले. याच पद्धतीने एकूण ३,९९९.६२ कोटी रुपये काढले. अॅम्फीचे सीईओ एन. व्यंकटेश यांच्यानुसार, इक्विटी फंडात शुद्ध खरेदीचा टप्पा सुरू होण्यात एक तिमाहीचा अवधी लागू शकतो. त्यांनी सांगितले की, गुंतवणूकदार आता आपल्या संपत्तीचे फेरवाटप करत आहेत. कंपनी रोख्यांत गुंतवणूक वाढली असल्याने गुंतवणूकदार आपला पैसा जास्त सुरक्षित फंडात हस्तांतरित करत असण्याची शक्यता आहे. आपण मागेही अशी स्थिती अनुभवली आहे. त्यांनी सांगितले की, डिसेंबर-जानेवारीपर्यंत इक्विटीमध्ये इन्फ्लो परत आला पाहिजे. ऑगस्टचे आकडे सांगतात की, डेट श्रेणी फंडातही शुद्ध निकासी झाली आहे. या श्रेणीतील फंडात ऑगस्टच्या तुलनेत ५.२७ लाख कोटींची गुंतवणूक आली, तर ५.३१ लाख कोटी पैसे काढले गेले. म्हणजे, ३,९०७.५३ कोट रुपयांची शुद्ध निकासी झाली. एन. व्यंकटेशनुसार, कंपन्यांनी महिन्याचा अखेरचा खर्च पूर्ण करण्यासाठी पैसा काढला. गेल्या महिन्यात डेट फंडात ९१,३९१.७३ कोटीची शुद्ध गुंतवणूक आली.

इक्विटीत पाच महिन्यांपासून घसरण सुरू

> डेटमध्ये जुलै महिन्यात ९१ हजार कोटींची गुंतवणूक आली. ऑगस्टमध्ये उणेत होती. > इंडेक्स आणि ईटीएफ फंडात केवळ सकारात्मक वृद्धी दिसत आहे.

एसआयपीच्या रकमेत किरकोळ घट

ऑगस्टमध्ये एसआयपीचा प्रवाह गेल्या महिन्याच्या ७,८३०.६६ कोटी रुपयांवरून घटून ७,७९१.६३ कोटी रुपये राहिला. म्हणजे, ३९ कोटी रुपयांची किरकोळ घसरण नोंदली. मात्र, यादरम्यान एसआयपी फोलिओच्या एकूण संख्येत ३.२७ कोटींवरून वाढून ३.३० कोटींवर पोहोचली आहे.

एकूण एयूएम घटून २७.४९ लाख कोटी

ऑगस्टमध्ये १४,५५३.११ कोटी रुपये काढल्यामुळे म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण अॅसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे एयूएमही घटून २७.४९ लाख कोटी रुपये राहिले. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात घसरणीनंतर रिकव्हरी होते तेव्हा अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांतून पैसा जास्त निघतो. मात्र, ही स्थिती दीर्घकाळासाठी नाही. बाजारात स्थैर्य येताच एएमसीमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह वाढेल. - संतोषकुमार सिंह, रिसर्च हेड, एओएएमसी

बातम्या आणखी आहेत...