आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Now The Facility To Send Live Text Messages On Video In IPhone, Notifications Also In A New Way

अ‍ॅपल iOS 16 लाँच:आता iPhone मध्ये व्हिडिओवर लाइव्ह टेक्स्ट मॅसेज पाठवण्याची सुविधा, नव्या पद्धतीने नोटिफिकेशन्स

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलने iPhone साठी iOS 16 लाँच केले आहे. यामध्ये iPhone वापरकर्त्यांसाठी iOS 16 मध्ये सर्वात मोठा बदल लॉक स्क्रीनसाठी दिसून येतोय. नवीन अपडेटसह, होम स्क्रीनवरील वॉलपेपर बदलण्यापासून ते सूचना व्यवस्थापित करण्यापर्यंत बदल करण्यात आले आहेत. iPhone ने Apple च्या WWDC 2022 इव्हेंटमध्ये ही अपडेटेड iOS 16 आवृत्ती सादर केली आहे. सप्टेंबरमध्ये iPhone 14 सोबत iOS 16 रिलीज होईल, अशा बातम्यादेखील येत आहे. हे अपडेट iPhone 8 च्या नंतरच्या आवृत्तीवर अपडेट होईल.

तज्ज्ञांच्या मते iOS 16 मध्ये नवे काय?

WWDC 2022 इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या iOS 16 च्या वैशिष्ट्याबाबत, टेक गुरू अभिषेक तैलंग यांनी सांगितले की, हा Apple iOS 16 बहुप्रतिक्षित रिव्हॅम्प आहे. iOS 16 च्या आगमनाने, आता कस्टमायझेशनच्या तक्रारी काही प्रमाणात दूर होतील. आयफोनवर, वापरकर्ते लॉक स्क्रीनसह बरेच बदल करू शकतात, ज्यामुळे फोन वेगळा दिसेल. त्याच वेळी, अ‍ॅपल च्या फोकस व्हिजिट अ‍ॅपवर उपस्थित केलेल्या प्रश्नाला देखील यामुळे विराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी कंपनीने या फिचरमध्ये बरेच बदल केले आहेत. तसेच, कार प्लेमध्ये केलेले बदल इलेक्ट्रिक कारमध्ये वापरल्या जाणार्‍या गॅजेट्सनुसार करण्यात आले आहेत. यामुळे इलेक्ट्रिक कारचे अधिक स्मार्ट पद्धतीने व्यवस्थापन करणे सोपे होईल.

अँड्रॉइडसह कस्टमायजेशन अ‍ॅप्सद्वारे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र, आता कंपनीने गोपनीयतेची विशेष काळजी घेतली असल्याचे दिसून येत आहे. अँड्रॉइड फोन्सना अगदी सुरुवातीपासूनच फॉन्ट आणि वॉलपेपरच्या बाबतीत कस्टमायझेशनची सुविधा मिळत होती, पण ज्यांना आयफोन वापरायचाय, त्यांच्यासाठी तशी सोय अजून झालेली नव्हती.

आता iOS 16 मध्ये कोणते नवीन अपडेट उपलब्ध असेल याबद्दल जाणून घेऊया.

iOS 16 मध्ये नवीन स्टाइल नोटिफिकेशन देण्यात आले आहे. लाइव्ह अ‍ॅक्टिव्हिटी असे त्याचे नाव आहे. याच्या मदतीने वर्कआऊट, लाइव्ह इव्हेंट्स, उबर राईड्स आणि इतर उपक्रम करता येतील. आता लॉक स्क्रीनच्या खाली नोटिफिकेशन दिले जाईल.

टेक्स्ट मॅसेज रिकॉल आणि स्नूझ करता येईल

अ‍ॅपल आता iMessage संपादित करण्याची किंवा रिकॉल करण्याची सुविधा देत आहे. अ‍ॅपलने आपल्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये तीन प्रमुख वैशिष्ट्ये जोडली आहेत. जर संदेश एसएमएस मजकुराऐवजी iMessage असेल तर वापरकर्ते पाठवलेला संदेश संपादित करू शकतात तसेच तो परत मागवू शकतात. याशिवाय, वापरकर्ते मजकूर स्नूझ देखील करू शकतात जेणेकरून तो नंतर हाताळता येईल.

टीव्ही शो पाहणे, संगीत ऐकणे किंवा मित्रांसह दूरनच खेळ शेअर करण्यासाठी फिटनेस+ वापरा. मॅसेज डिक्टेशन मध्येही बदल करण्यात आला आहे. यामुळे आवाजी आणि टच दरम्यान सहजता प्राप्त होईल.

लाइव्ह टेक्स्ट आता व्हिडिओमध्येही

थेट मजकूर देखील अपडेट केले गेले आहे. याचा वापर आता व्हिडीओमध्येही करता येईल. यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉझ करुन त्यावरील टेक्स्ट कॉपी देखील करू शकाल. याशिवाय, फोटोमधून एखादी वस्तू बाजूला हटवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...