आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • IPhone 14 Series 4 Model Launched I Know About The Price And Features I Latest News And Update 

आयफोन-14 सीरीजचे 4 मॉडेल लॉंच:अ‌ॅपलने नवीन फोनसह घड्याळाचे मॉडेल केले सादर; जाणून घ्या किंमत अन् फीचर्सबद्दल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयफोन-14 सीरीज बुधवारी रात्री कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो शहरात लॉंच करण्यात आली आहे. Apple ने यावेळी iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि 14 Pro Max हे चार मॉडेल लॉंच केले आहेत. भारतात iPhone 14 सीरीजसाठी प्री ऑर्डर 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. तर आयफोन 14 प्लस वगळता सर्व मॉडेल 16 सप्टेंबरपासून भारतीय बाजारात उपलब्ध होतील. तर आयफोन-14 प्लस 9 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे.

आयफोनची सुरुवातीची किंमत रु. 79,900

 • iPhone-14 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आलेला आहे. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 79,900, 89,900 आणि 1 लाख 9,900 रुपये आहे.
 • iPhone 14 Plus वरील स्टोरेजमध्येच देखील सादर करण्यात आला आहे. त्यांची किंमत 89,900, 99,900 आणि 1,19,900 रुपये आहे.
 • iPhone 14 Pro 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. त्यांची किंमत 1,29,900, 1,39,900, 1,59,900 आणि 1,79,900 रुपये आहे.
 • iPhone 14 Pro Max ची स्टोरेज क्षमता देखील अशीच असून किंमत 1,39,900, 1,49,900, 1,69,900 आणि 1,89,900 रुपये आहे.

सीरीज- 8 SE अल्ट्रा वॉच देखील झाली लॉंच

 • कंपनीने मोठा डिस्प्ले आणि बॉडी-टेम्परेचर सेन्सरसह अधिक आरोग्य वैशिष्ट्यांसह वॉच सीरिज-8 लॉंच केली आहे.
 • SE, Ultra Watch आणि AirPods Pro 2 देखील सादर करण्यात आलेले आहे.
 • वॉच सीरीज 8 ची किंमत 45 हजार 900 रुपये आहे. SE ची किंमत रु.29,900 आहे. आणि अल्ट्राची किंमत रु.89,900 आहे. आहे. वॉच-8 सीरीज आणि SE वॉच 16 सप्टेंबरपासून सर्वत्र उपलब्ध होतील. तर अल्ट्रा वॉच 23 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील.

अ‌ॅपलने नवीन AirPods केले लॉंच
एअरपॉड्स प्रो सेकंड जनरेशन देखील बुधवारी रात्री झालेल्या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याची किंमत 26,900 रुपये आहे. 9 सप्टेंबरपासून ग्राहकांना त्याची ऑर्डर देता येणार आहे. 23 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील.

चला तर मग जाणून घेऊया अ‌ॅपलच्या या सर्व उत्पादनांबद्दल आणि आयफोन-14 सीरीजबद्दल...

बातम्या आणखी आहेत...