आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Iphone Manufacturing Plant In Telangana; Foxconn Create Many Jobs | Apple Inc | Foxconn

तेलंगणात येणार आयफोन निर्मिती प्रकल्प:1 लाखाहून अधिक नोकऱ्या देणार फॉक्सकॉन, कंपनी करणार 5.7 हजार कोटींची गुंतवणूक

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपल इंकचे भागीदार फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी तेलंगण राज्यात नवीन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तैवानची बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट उत्पादक कंपनी फॉक्सकॉन तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील कोंगारा कलां येथे प्लांट उभारणार आहे.

फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी 2 मार्च रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबाद येथे भेट घेतली. जिथे हा प्लांट उभारून कंपनी 1 लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देईल असे दोघांमध्ये एकमत झाले होते. वृत्तानुसार, फॉक्सकॉन हा प्लांट उभारण्यासाठी सुमारे 700 मिलियन (सुमारे 5.7 हजार कोटी) गुंतवणूक करेल.

बातम्या आणखी आहेत...