आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्याच्या मध्यापर्यंत 5 जीची सेवा मिळणार:आयफोनमध्ये डिसेंबरपासून सुरू होईल, 5जी फोन निर्मात्यांचे सरकारला आश्वासन

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५जी फोन निर्मात्यांनी सरकारला आश्वासन दिले की, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्वच ५जी सक्षम मोबाइल फोनमध्ये ५जीची सेवा मिळु लागेल. ही सेवा स्टँड अलोन (जिअो) आणि नॉन-स्टँड अलोन (एअरटेल) दोन्ही प्रकारच्या नेटवर्कमध्ये उपलब्ध राहिल. दुसरीकडे, भारती एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टलच्या मते, सॅमसंगचे २७ ५जी स्मार्टफोनपैकी सुमारे १६ फोनमध्ये ५जी सेवा सुरू झाली आहे. वनप्लसचे १७ स्मार्टफोन आणि वीव्होच्या ३४ स्मार्टफोनमध्ये ५जी सेवा सुरू झाली आहे. रिअलमीचे सर्वच ३४ स्मार्टफोन यूजर्सला एअरटेल ५जी सुविधा मिळत आहे. शाओमीचे सर्वच ३३ स्मार्टफोन आणि ओपोच्या १४ स्मार्टफोनमध्ये ५जीची मदत मिळत आहे. इतर स्मार्टफोन युजर्सलादेखील १० ते १२ नाेव्हेंबरपर्यंत ५जीचा लाभ मिळेल.

आयफोनमध्ये डिसेंबरपासून सुरू होणार - ५जी एनेबल्ड आयफोन युजर्स ज्यांनी आयओएस१६ बीटा सॉफ्टवेअर अपडेट डाउनलोड केले आहे. ते ५ जी सेवा ट्राय करू शकतात. या सॉफ्टवेअरचे फायनल अपडेट डिसेंबरमध्ये होईल.

बातम्या आणखी आहेत...