आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातून एसएमईअंतर्गत फॅशन ज्वेलरी सेक्टरमधून लिस्ट होणारी पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीच्या शेअरची नोंदणी मुंबई शेअर बाजारात तब्बल ९०% च्या प्रीमियमसह ५७ रुपयांना मंगळवारी झाली. गार्गी बाय पी. एन. गाडगीळ अँड सन्स या फॅशन ज्वेलरी ब्रँड अंतर्गत कंपनी विविध प्रकारच्या फॅशन ज्वेलरीची विक्री करते. सत्रांतर्गत व्यवहारात कंपनीचा शेअर ५९.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. शेअर नोंदणीच्या वेळी अजित गाडगीळ, डॉ. रेणू गाडगीळ, अमित मोडक, बीएसईचे समीर पाटील, आदित्य मोडक, बीएसई एसएमइचे अजय ठाकूर आदी उपस्थित होते. फॅशन ज्वेलरी हा भविष्यात लाइफस्टाइलचा एक महत्त्वाचा घटक ठरणार असून, या क्षेत्रातील व्यवसायाची क्षमता लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीने या क्षेत्रात पदार्पण केले आहे, असे अमित मोडक यांनी सांगितले. बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्म अंतर्गत कंपनीला आयपीओ करण्याची मान्यता मिळाली होती. कंपनीने १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी ३० रुपये किंमत निश्चित केली होती. किमान चार हजार शेअरच्या एका लॉटसाठी अर्ज करायचा होता. आयपीओ ८ ते १३ डिसेंबरदरम्यान खुला होता. त्यास २१५ पटींपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. कंपनी २६ लाख शेअरच्या विक्रीतून ७.८० कोटी रुपयांचे भांडवल गोळा करण्याची योजना होती. आयपीओला तब्बल १७०० कोटी रुपयांहून अधिकची बोली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.