आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC च्या IPO ला अँकर गुंतवणूकदारांचा प्रतिसाद:5,620 कोटी रुपयांचे शेअर सब्सक्राइब, उद्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडेल IPO

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) समभागांना अँकर गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या बाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेले 5,620 कोटी रुपयांचे शेअर पूर्णपणे सबस्क्राइब झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, नॉर्वेजियन वेल्थ फंड नॉर्जेस बँक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि सिंगापुर सॉवरेन वेल्थ फंड GIC सह इतर अँकर गुंतवणूकदारांना 4 मे रोजी IPO उघडण्यापूर्वी शेअर्स वाटप करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 5,620 कोटी रुपयांचे शेअर अँकर गुंतवणूकदारांसाठी होते आणि ते सर्वच शेअर सब्सक्राइब झाले आहे.

अँकर गुंतवणूकदारांसाठी 35% राखीव

LIC च्या IPO मध्ये एकूण विक्री करण्यात येत असलेल्या भागीदारीपैकी 3.5% स्टेकपैकी 50% पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIP) साठी राखून ठेवलेली आहे. ज्यात अँकर गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. QIP साठी आरक्षित समभागांपैकी 35% अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव होते.

21,000 कोटी रुपये उभे राहण्याची सरकारला आशा

केंद्र सरकारला LIC च्या IPO मधून 21,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. IPO अंतर्गत, सरकार कंपनीतील आपले 22.13 कोटी शेअर्स विकत आहे. त्यासाठी 902 ते 949 रुपये प्रति शेअर निश्चित केले आहे.

IPO संस्थात्मक आणि किरकोळ खरेदीदारांसाठी 4 मे रोजी उघडेल आणि 9 मे रोजी बंद होईल. कंपनीचे शेअर्स 17 मे रोजी IPO बंद झाल्यानंतर एका आठवड्यानंतर स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील.

पॉलिसीधारकांना वेगळा लाभ मिळेल

DRHP नुसार, 10% (2.21 कोटी समभाग) LIC पॉलिसीधारकांसाठी आरक्षित भागांतर्गत राखीव असतील. पॉलिसीधारकांना IPO मध्ये 60 रुपयांची सूट मिळेल.

संपूर्ण गणित समजून घ्या

  • LIC चा IPO प्राइस बँड रु.902 ते रु.949 दरम्यान आहे आणि लॉट साइज 15 शेअर्स आहे.
  • तुम्ही पॉलिसीधारक कोट्यातून IPO साठी अर्ज केल्यास (949-60=889×15=रु. 13,335), किमान रु. 13,335 गुंतवावे लागतील.
  • तर सामान्य गुंतवणूकदाराला वरच्या किंमतीनुसार 14,235 रुपये गुंतवावे लागतील.
  • अशाप्रकारे, पॉलिसीधारकाला एका लॉट IPO च्या अर्जावर एकूण 900 रुपयांची सूट मिळेल.
  • दुसरीकडे, जर तुम्ही IPO मधील कमी किंमतीच्या बँडनुसार पॉलिसीधारक कोट्यातून अर्ज केला (902-60=842×15=रु. 12,630), तर किमान रु. 12,635 गुंतवावे लागतील.
  • तर सामान्य गुंतवणूकदाराला वरच्या किंमतीच्या बँडनुसार 13,530 रुपये गुंतवावे लागतील.

IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते अनिवार्य

सेबीच्या नियमांनुसार, कोणत्याही कंपनीचे शेअर्स केवळ डिमॅट स्वरूपात जारी केले जातात. त्यामुळे कोणीही, मग ते पॉलिसीधारक असोत किंवा किरकोळ गुंतवणूकदार असो, त्यांच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...