आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जार आपल्या सर्वकालीन उच्चांकाचा विक्रम स्थापन करत चालला आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांमध्ये द्विधा स्थिती निर्माण झाली की, सध्याच्या गुंतवणुकीतून नफावसुली कशी करावी. मूल्यांकन एवढे वाढलेले दिसत असताना यामागे खूप सारे प्रोत्साहन आणि कमी व्याज दर हे आहेत लक्षात घेतले पाहिजे. आर्थिक वृद्धीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात गुंतवणुकीच्या वातावरणास आणखी प्रोत्साहन मिळू शकते. यामुळे दरवर्षी देशातील आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अतिरिक्त इन्फ्लो इक्विटी मार्केटमध्ये येऊ शकते. यामुळे बाजारात तेजीचा आणखी एक टप्पा पाहायला मिळू शकतो.
असे असले तरी बाजार उंचीकडे झेपावत असलेल्या स्थितीत रिटेल गुंतवणूकदारांची सामान्य मनोवृत्ती सतर्क राहिली पाहिजे. बाजारातील महत्त्वाच्या बिंदूंचा खुलासा करणाऱ्या डेटाच्या आढाव्यातून गुंतवणूकदारांची धारणा शांत केली जाऊ शकते. जानेवारी २०१८ पासून नोव्हेंबर २०२० च्या अवधीत निफ्टीत ५० ने २४.३% चा परतावा दिला. निफ्टी-५० इक्वल वेट इंडेक्सच्या हेवीवेट शेअर्सनी चांगली कामगिरी केली. अशात अनेक शेअर्स आणि बाजार श्रेणी अद्यापही गुंतवणूकदारांच्या आकर्षक मूल्यांकनासाठी उपलब्ध आहेत. मात्र, योग्य शेअर आणि बाजार श्रेणी निवडणे अद्यापही लाख मोलाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे बाजार महागड दिसतो आणि लार्ज-कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, असे शेअर तुलनात्मकदृष्ट्या लवचिक होऊ शकतात. मात्र, लार्ज-कॅपने आधीच गेल्या तीन कॅलेंडर वर्षांत दरवर्षी सकारात्मक परतावा दिला आहे. यामुळे या स्टॉकमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी कमी होते. याशिवाय आर्थिक चक्रादरम्यान वेगवेगळे बाजार भांडवलीकरण वेगवेगळी कामगिरी करतात आणि सलग कोणतीही एक श्रेणी विजेती होत नाही. २०१० पासून २०१९ च्या मागील दशकादरम्यान चार-चार वेळेस लार्ज कॅप आणि मिड कॅप श्रेणी विजेती राहिली होती. स्मॉल कॅप श्रेणी केवळ दोन वेळा विजेती राहिली. मात्र, स्मॉल कॅप स्टॉकने या वर्षांत दर वर्षी ६०% पेक्षा जास्त ठोस रिटर्न दिला. कोणत्या एका श्रेणीशी चिकटून राहण्यापेक्षा वेगवेगळ्या बाजार भांडवलीकरणाच्या श्रेणीशी संपर्कात राहणे गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. यामुळे उपलब्ध गुंतवणूक संधीचे सर्वोत्तम प्राप्त केले जाऊ शकेल.
अशा स्थितीत मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंड एक गुंतवणूक पर्यायाच्या रूपात समोर येतात. हे फंड विविध बाजार भांडवलीकरण श्रेणीत गुंतणूक करतात. याशिवाय फंड ऑफ फंडही आहे,जो लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड/ ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना मल्टी कॅप/ फ्लेक्सी कॅपमध्ये गुंतवणुकीचा आनंद देतात.
एकाच फंडासोबत अनेक बाजार भांडवलीकरण श्रेणीत गुंतवणूक करून गुंतवणूकदार अशा फंडाच्या ऑपरेशनल कौशल्याचा लाभ घेऊ शकता. यामुळे कशाची निवड करावी ही त्यांची द्विधा स्थिती दूर होईल. सौगत चटर्जी चीफ बिझनेस आॅफिसर, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.