आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • IT, Sales Jobs Increased; Demand For Skilled Workers, 11% Salary Increase; Analysis Of Profiles In 17 Regions In 9 Metros Of The Country; News And Live Updates

रिपोर्ट:आयटी, सेल्सचे जॉब वाढले; कुशलव्यक्तींना मागणी, 11% पगारवाढ; देशाच्या 9 महानगरांत 17 क्षेत्रांतील प्रोफाइल्सचे विश्लेषण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11% पेक्षा जास्त वेतनवाढीचे सुपर स्पेशलाइज्ड जॉब प्रोफाइल

गेल्या वर्षभरात विक्री आणि आयटीशी संबंधित नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. पगारवाढीतही हे क्षेत्र पुढे राहिले. रोजगार आणि भरती क्षेत्रात काम करणारी कंपनी टीम लीजकडून जारी जॉब्ज अँड सॅलरी प्रायमर रिपोर्ट-२०२१ मध्ये ही माहिती दिली. अहवालानुसार, महामारीच्या व्यवसायात आयटीचे महत्त्व वाढले आहे. दुसरीकडे, लॉकडाऊननंतर सेल्ससंंबंधित नोकऱ्यांच्या हायरिंगची प्रवृत्ती वाढली आहे.

हा अहवाल अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुण्यात १७ क्षेत्रांच्या २,६३,००० प्रोफाइल्सच्या विश्लेषणातून तयार केला. सेल्समध्ये जास्त मागणी ब्रँड सेंटर एग्झिक्युटिव्ह, मर्चंट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, सीआरएम अँड सेल्स अॅडमिनिस्ट्रेटर आणि इन्फ्लुएन्सर मार्केटरच्या आहेत.

11% पेक्षा जास्त वेतनवाढीचे सुपर स्पेशलाइज्ड जॉब प्रोफाइल

  • बँकिंग ट्रेनर : बँकिंग, फायनान्स , इन्शुरन्स - 11.32%
  • कंप्लायन्स ऑफिसर : कन्स्ट्रक्शन अँड रिअल इस्टेट - 11.10%
  • सॉफ्टवेअर टेस्ट स्पे : आयटी अँड नॉलेज सर्व्हिसेस - 10.58%

हे जॉब कोविडप्रूफ सिद्ध
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या नोकऱ्या वाचल्या नाहीत तर पगारातही ८-१० टक्क्यांची वाढ झाली. ३५० नोकऱ्यात केलेल्या सर्वेक्षणात ३५ जॉब कोविड चाचणीत परिपूर्ण ठरले.

कौशल्यावरील गुंतवणुकीतून विस्तार
एम्प्लॉयर आशावादी आहेत. तेे कोविडचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कौशल्यावर आधारित गुंतवणुकीतून व्यवसायाचे सातत्य जारी ठेवण्यास मदत मिळेल. नवोन्मेषालाही प्रोत्साहन मिळेल.- रितुपर्णा चक्रवर्ती, सहसंस्थापक , टीमलीज

बातम्या आणखी आहेत...