आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहीत आहे का?:कॅम्पा कोलानेच दिला होता सलमानला ब्रेक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायंस इंडस्ट्रीजने घरगुती बेव्हरेज कंपनी कॅम्पा खरेदी करून ९० च्या दशकात अत्यंत लोकप्रिय कॅम्पा कोलाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. याच सॉफ्ट ड्रिंक ब्रँडने सलमान खानला पहिला ब्रेक दिला होता. चित्रपटांत येण्यापूर्वी सलमानने १९८३ मध्ये कॅम्पा कोलाची जाहिरात केली होती. ती मालदिवमध्ये चित्रीत झाली होती. यात सलमानसोबत जॅकी श्रॉफ आणि आयशाही होते. याच्या जवळपास तीन दशकांपूर्वी १९४९ मध्ये कोका कोला भारतात आणण्याचे श्रेयही कॅम्पा कोलाचेच. त्या काळात भारतीय बाजारात कोका कोलाचे उत्पादन आणि वितरण कॅम्पाच करायची.

बातम्या आणखी आहेत...