आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Chinese Billionaire Jack Ma Takes Up Professor Role; Professor Role At Tokyo College | Jack Ma

जॅक मा बनले प्राध्यापक, विद्यार्थ्यांना लेक्चर देणार:टोकियो विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून झाले रुजू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाबा ग्रुपचे सह संस्थापक जॅक मा हे टोकियो विद्यापीठातील एका कॉलेजमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जॉईन झाले आहेत. विद्यापीठाच्या प्रोफाइल पेजच्या आधारे ब्लूमबर्गने एक वृत्त प्रकाशित केले आहे.

यानुसार 58 वर्षीय जॅक मा संशोधनाच्या विषयांवर सल्ला देतील आणि संशोधनही करतील. या संशोधनात विशेषतः कृषी आणि अन्न उत्पादनासारख्या विषयांचा समावेश असेल. याशिवाय उद्योजकता आणि संशोधनावर ते सेमिनारही घेतील. जॅक मा कशा प्रकारचे लेक्चर्स किंवा सेमिनार घेतील याचे तपशील टोकियो स्कूलने दिले नाहीत.

टीकेनंतर जिनपिंग यांच्या निशाण्यावर

आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक राहिलेले जॅक मा चीन सरकारच्या धोरणांवर टीकेनंतर जिनपिंग यांच्या निशाण्यावर आले होते. यानंतर मा यांची कंपनी अॅन्ट ग्रुपचा आयपीओ रोखण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर अब्जावधी डॉलर्सचा दंडही लावण्यात आला होता. यानंतर जॅक मा गायब झाले होते.

नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी शेवटचे ट्विट केले होते. आणि 2021 मध्ये त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात ते म्हणाले होते की कोरोना संकट संपल्यावर पुन्हा भेटू. यानंतर ते नेदरलँडस, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये दिसले होते. गेल्या महिन्यातच ते चीनमध्ये परतले आहेत.

चीनला परतल्यावर युंगु स्कूलमध्ये पोहोचले

चीनमध्ये परतल्यानंतर जॅक मा त्यांचे गाव हांगझोऊतील युंगु स्कूलमध्ये गेले होते. तिथे अलिबाबाचे मुख्यालयही आहे. ही शाळा अलिबाबाच्या निधीद्वारे चालते. यातील बहुतांश विद्यार्थी हे अलिबाबातील कर्मचाऱ्यांची मुले आहेत. मा यांनी शाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे शिक्षणासमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांविषयी चर्चा केली होती.

ही बातमीही वाचा...

चीनमध्ये 6 वर्षांत 5 वा अब्जाधीश 'गायब':विरोध करणाऱ्यांना उचलते चीन सरकार… काही परतले; काही तुरुंगात

चीनमध्ये पुन्हा एकदा अब्जाधीश उद्योजक बेपत्ता आहे.... चीनच्या आयटी क्षेत्रातील मोठे नाव मानले जाणारे बाओ फान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कंपनीच्या संपर्कात नाही. त्यांची गुंतवणूक बँक चायना रेनेसाँच्या म्हणण्यानुसार, त्यांना सरकारी तपासणीच्या संदर्भात बोलावण्यात आले होते, त्यानंतर त्याच्याशी संपर्क झाला नाही. (वाचा पूर्ण बातमी)