आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्य लढ्यात उद्योजकांची भूमिका:जमशेदजींनी आयआयएससीसाठी कर्झनशी दीर्घ लढा दिला

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे अनेक राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी नेत्यांशी जवळचे संबंध होते. दादाभाई नौरोजी आणि फिरोजशाह मेहता यांचा त्यात समावेश आहे. एवढेच नव्हे तर १८८५ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या बैठकीतदेखील जमशेदजी सहभागी झाले होते. सुरुवातीच्या काळात काँग्रेसला निधीसाठी ते योगदान करत. जगप्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि ताजमहाल हॉटेल हे त्यांच्या राष्ट्रवादी विचाराचे फलित आहे.

१९व्या शतकात भारतीयांना युरोपाच्या उत्कृष्ट हॉटेलमध्ये जाण्यास मनाई होती. ताजमहल हॉटेल त्या अपमानास्पद वागणुकीचे चोख प्रत्युत्तर होते. सप्टेंबर १८९८मध्ये जमशेदजीने विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. त्यासाठी ३० लाख रुपयाचे दान दिले. ही रक्कम टाटाच्या पूर्ण संपत्तीचा अर्धा भाग होता. कर्झन यांच्या आक्षेपामुळे हा प्रस्ताव लंडनला गेला आणि तेथील रॉयल सोसायटीने प्राध्यापक विल्यम रामसे यांना भारतात पाठवले.

रामसे यांनी बंगळुरूमध्ये आयआयएससीच्या स्थापनेला हिरवा कंदील दाखवला, मात्र कर्झन अडून बसला. त्याने तेव्हाचे ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ लॉर्ड हॅमिल्टन यांना पत्र लिहून टाटांच्या महत्त्वाकांक्षेमुळे धोका असल्याचे सांगितले. कर्झनचा हा डावही चालला नाही, तो बरेच दिवस टाळत राहिला. शेवटी १९०५ मध्ये तो यासाठी तयार झाला आणि १९११ मध्ये आयआयएससीची सुरुवात झाली. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच औद्योगिक स्वातंत्र्यदेखील गरजेचे असल्याचे जमशेदजी यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी बिहारच्या सिंहभूमीत आशियाचा पहिला स्टील प्लँट सुरू केला. तेच आज जमशेदपूरच्या नावाने ओळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...