आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Jan Aushadhi Generic Drugstore; Narendra Modi Government Plans To Increase Kendra To 10000 By 2024

असे सुरू करा स्वतःचा व्यवसाय:पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजनेतून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी, केंद्र सरकारच्या या योजनेतून अशा पद्धतीने करता येईल कमाई

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारच्या या योजनेतून करु शकता कमाई

कोरोना महामारीच्या काळात औषधांचा खप झपाट्याने वाढला आहे. अशात तुम्ही फार्मा क्षेत्राशी संबंधित व्यवसायातून देखील पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी आता केंद्र सरकारकडून मदतीचा हात मिळणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्र सुरु केले आहे. पंतप्रधान जनऔषधी केंद्र योजनेतंर्गत मार्च 2024 पर्यंत देशभरात अशाप्रकारच्या केंद्रांची संख्या वाढवून 10 हजार करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या देशात 11 जूनपर्यंत 7,836 जनऔषधी केंद्रे आहेत.

केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मनसुख मंडाविया यांनी अलीकडेच हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील प्रागपूर येथे जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनीदेशभरात पंतप्रधान जनऔषधी केंद्र योजनेतंर्गत 10 हजार आस्थापने उघडण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल सांगितले. सामान्य आणि गरजू लोकांना कमी किंमतीमध्ये औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. या माध्यमातून केंद्र सरकार गरिबांना स्वस्तात औषधे उपलब्ध करुन देते.

दुकानदाराला 20 % वाटा मिळतो
या योजनेद्वारे देशात जास्तीत जास्त केंद्रे उभारण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नाचा 20 टक्के वाटा हा दुकान चालवणाऱ्याला दिला जातो. याशिवाय, संबंधित व्यावसायिकाला प्रोत्साहनपर भत्ताही दिला जातो.

केंद्र उघडण्यासाठी आलेला खर्च परत देते सरकार
नॉर्मल इंसेटिव्हमध्ये सरकार दुकान उघडण्यासाठी आलेला खर्च परत देते. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे फर्निचर, कॉम्प्युटर आणि फ्रीजसाठी 50 हजारापर्यंत रक्कम दिली जाते. मात्र, ही 2 लाखांची रक्कम टप्प्याटप्याने परत दिली जाते.

जनऔषधी केंद्र कोण सुरु करु शकते?

  1. बेरोजगार फार्मासिस्ट, सामान्य व्यक्ती, डॉक्टर आणि नोंदणीकृत मेडिकल व्यावसायिक हे केंद्र सुरु करु शकतात.
  2. ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खासगी रुग्णालये, स्वयं सहायता गट यांचा समावेश आहे.
  3. राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्या संस्था.

जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी रिटेल ड्रग्स सेल्सचा परवाना घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही https://janaushadhi.gov.in/ संकेतस्थळावरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता. हा फॉर्म भरुन ब्यूरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर (A&F) कडे पाठवावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...