आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान सेवा:जेट एअरवेज पुन्हा करू शकते उड्डाण, मार्ग मोकळा होण्याची शक्यता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल 2019 पासून बंद आहे जेटचे परिचालन

दोन वर्षांपूर्वी दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर गेलेली जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करू शकते. सध्या तशी स्थिती निर्माण झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) जेट एअरवेजसाठी जालान-कालरॉक कन्सॉर्टियमच्या तोडगा योजनेला सशर्त मंजुरी दिली आहे. मोहम्मद अझमल आणि व्ही. नल्लासेनापती यांच्या अध्यक्षतेखालील एनसीएलटीच्या पीठाने योजना कार्यान्वित करण्यासाठी ९० दिवसांचा अवधी दिला. हा अवधी २२ जूनपासून सुरू होईल. पीठाने तोंडी आदेशात म्हटले आहे की, जर प्रभावी तारीख पुढे वाढवण्याची आवश्यकता असेल तर संबंधित पक्ष ट्रिब्युनलशी पुन्हा संपर्क साधू शकतात. जेट एअरवेजला स्लॉट अलॉट करण्याबाबत ट्रिब्युनलने कुठलेही निर्देश दिले नाहीत. हे प्रकरण सरकार आणि योग्य प्राधिकरण पाहतील, असे याबाबत ट्रिब्युनलने म्हटले. जेट एअरवेजचे पुन्हा परिचालन होण्यासाठी स्लॉट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कंपनीचे स्लॉट इतर एअरलाइन्सला देण्यात आले आहेत.

एप्रिल २०१९ पासून बंद आहे जेटचे परिचालन
दोन दशके परिचालन केल्यानंतर १७ एप्रिल २०१९ पासून जेट एअरवेजची विमाने उभी आहेत. स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील तिच्या कर्जदाता बँकांच्या समूहाला कंपनीकडून ८,००० कोटी रुपयांची वसुली करायची आहे. त्यासाठी त्यांच्यातर्फे जून २०१९ मध्ये कंपनीला दिवाळखोर घोषित करण्याची याचिका दाखल झाली होती. तथापि, ऑक्टोबर २०२० मध्ये कर्जदात्यांनी ब्रिटनच्या कालरॉक कॅपिटल आणि संयुक्त अरब अमिरातीचे व्यावसायिक मुरलीलाल जालान यांच्या कन्सॉर्टियमची तोडगा योजना मंजूर केली होती.

मुरारीलाल जालान
मुरारीलाल जालान

लहानपणापासून काही वेगळे करू इच्छित होते जेट एअर.चे नवे मालक
कॉलरॉकसह जेट एअरवेजची बोली जिंकणारे मुरारीलाल जालान यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात रांचीच्या बाजारातून झाली होती. येथे त्यांचे वडील गणेश प्रसाद जालान कागदाचा व्यवसाय करत हाेते. हा त्यांचा वडिलोपार्जित धंदा होता. जालान यांचे भाऊ नारायण जालान म्हणाले, मुरारीलाल लहानपणापासून सर्जनशील होते. त्यांचे विचार नेहमी काळाच्या पुढे असत. ते नेहमी काहीसे वेगळे करू इच्छित होते. १९८८ मध्ये चर्च कॉम्प्लेक्समध्ये क्यूएसएस नावाने फोटो कलर लॅब सुरू केली. रांचीतून बाहेर पडत जालान यांनी अनेक देशांत विविध व्यवसाय विस्तार केला. ते यूएईच्या एमजे डेव्हलपर्स कंपनीचे मालक आहेत. त्यांनी रिअल इस्टेट, खनिज, ट्रेडिंग, बांधकाम, एफएमसीजी, ट्रॅव्हल अँड टुरिझम, इंडस्ट्रियल वर्क्स आदी क्षेात गुंतवणूक केली आहे. त्यांच्या कंपनीने यूएई, भारत, रशिया आणि उझबेकिस्तानसह अनेक देशांतील विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. त्यांची कंपनी उझबेकिस्तानमध्ये गृह प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प करत आहे. ते सध्या ताश्कंदमध्ये राहतात.

दक्षिण आफ्रिकेच्या गुप्ता बंधूंशीही नाते
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जालान द. अाफ्रिकेच्या गुप्ता बंधूंशी नाते आहे. मुरारीलाल यांच्या भावाच्या कन्येचा विवाह गुप्ता बंधूंच्या घरात झाला आहे. गुप्ता बंधूंवर द. आफ्रिकेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. जेट व्यवहारात पडद्याआडून गुप्ता बंधूंचीही भूमिका असू शकते, असेही आरोप केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...