आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चायनीज फोनसाठी धोक्याची घंटा:जिओ आणि गूगलची भागीदारी भारतीय बाजार पेठेतील चिनी स्मार्टफोनचे वर्चस्व संपवू शकते

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गूगलने मागच्या आठवड्यात जिओमध्ये 33 हजार 600 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे

भारताच्या स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण आता रिलायंस इंडस्ट्रीजचा जिओ प्लॅटफॉर्म आणि अमेरिकन टेक कंपनी गूगलच्या भागीदारीनंतर भारतीय बाजारातील चीनी स्मार्टफोनचे वर्चस्व कमी होऊ शकते. गूगलने मागच्या आठवड्यात जिओमध्ये 4.5 अब्ज डॉलर (जवळपास 33,600 कोटी रुपये)च्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

या गुंतवणुकीतील काही पैशांचा उपयोग जिओ सर्वात स्वस्त स्मार्टफोन तयार करण्यासाठी करणार आहे. या बळावर जिओ आणि गूगल देशातील त्या लोकांपर्यंत पोहचू शकतात, ज्यांनी आतापर्यंत स्मार्टफोनचा वापर केलेला नाही. देशात आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त लोक स्मार्टफोन वापरत नाहीत.

17% बाजार सॅमसंगकडे

रिसर्च फर्म कॅनालिसनुसार, एप्रिल-जून तिमाहीत भारतात विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये चीनी कंपन्यांचे योगदान 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगची बाजारात 17 भागीदारी आहे. आयडीसीच्या सीनियर रिसर्च मॅनेजर किरणजीत कौर म्हणाल्या की, जिओ आणि गूगलच्या स्वस्त स्मार्टफोनमुळे चीनी कंपन्यांना धोक्याची घंटा आहे.