आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅस्डॅक-लिस्टेड एअरस्पॅन नेटवर्क आणि जिओ प्लॅटफॉर्म्सची सब्सिडरी कंपनी रॅडिसिस कॉर्पोरेशनने एक करार केला आहे. यानुसार रॅडिसिस कर्जमुक्त तत्वावर नेटवर्क्सचे 6 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 491 कोटींत अधिग्रहण करेल.
एअरस्पॅनने कॉस्ट इफेक्टिव्ह फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस नेटवर्क कनेक्शनला टार्गेट करण्यासाठी 2018 मध्ये मिमोसा नेटवर्क अधिग्रहित केले होते. मिमोसाचे जिओ प्लॅटफॉर्मसोबत ट्रान्झॅक्शन नियमांच्या अधीन आहे. हे 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
प्रॉडक्ट पोर्टफोलियोत WiFi 5 आणि नवे WiFi 6E तंत्रज्ञान
मिमोसा नेटवर्ककडे WiFi 5 आणि नव्या WiFi 6E तंत्रज्ञानावर आधारित पॉईंट-टू-पॉईंट आणि पॉईंट-टू-मल्टी-पॉईंट प्रॉडक्टचे पोर्टफोलिओ आहे. यासोबतच ट्विस्ट ऑन अँटेना, PoE इंजेक्टरसारख्या याच्याशी संबंधित अॅक्सेसरीज आहेत. जिओ मिमोसाच्या प्रमुख ग्राहकांपैकी एक आहे.
रॅडिसिसच्या अधिग्रहणानंतरही मिमोसाची उत्पादने डेव्हलपमेन्ट, मॅन्युफॅक्चरिंग आणि 56 कर्मचाऱ्यांची सेल्स टीम मिमोसासह जोडलेली असेल.
कॉस्ट-इफेक्टिव्ह फिक्स्ड मोबाईल ब्रॉडबॅन्ड मिळेल
जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमन म्हणाले, 'मिमोसाचे अधिग्रहण टेलिकॉम नेटवर्क प्रॉडक्टसच्या प्रॉडक्शनमध्ये जिओचे इनोव्हेशन आणि लीडरशीप आणखी गतिमान करेल. यामुळे ग्राहकांना कॉस्ट इफेक्टिव्ह, रॅपिडली डिप्लॉएबल फिक्स्ड मोबाईल ब्रॉडबॅन्ड मिळेल.'
तर एअरस्पॅनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक स्टोनस्ट्रॉम म्हणाले, 'हे एअरस्पॅनची बॅलन्स शीट मजबूत करेल, ज्यामुळे कंपनी 4 जी आणि 5 जी खासगी आणि एमएनओ नेटवर्क पुढे नेण्यास सक्षम होईल. हे आमचे मुख्य लक्ष्य आहे.'
2022 मध्ये जिओने 5G FWA अनएव्हिल केले होते
जिओने ऑगस्ट 2022 मध्ये आपले 5G फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस FWA सोल्यूशन अनएव्हिल केले होते. याला जिओ एअरफायबर म्हटले जाते. याद्वारे कंपनी 10 कोटी घरांना टार्गेट करत आहे. तथापि, हे सोल्यूशन अजूनही व्यावसायिकरित्या उपलब्ध नाही. दुसरी रँकींग असलेल्या भारती एअरटेलचाही देशातील ग्राहकांना 5G FWA सेवा देण्याचा प्लॅन आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.