आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलायन्स:जिओ 2021 च्या मध्यापर्यंत आणणार 5 जी सेवा, मुकेश अंबानी यांनी केली घोषणा - नेटवर्कपासून हार्डवर्कपर्यंत सर्व स्वदेशी असेल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील वर्षी म्हणजे २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत 5 जी सेवा सुरू करू शकते. ही घोषणा स्वत: कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मंगळवारी इंडिया मोबाइल काँग्रेस-२०२० ला संबोधित करताना केली. कोरोनामुळे ही काँग्रेस ऑनलाइन होत आहे. अंबानींनी मांडलेले मुद्दे असे...

“चार वर्षांत भारतीय मोबाइल काँग्रेसची प्रतिष्ठा आणि प्रभाव सातत्याने वाढला आहे. भारताच्या दोन अद्वितीय शक्तींमुळे हे शक्य झाले आहे. पहिली शक्ती-तीन डी यांचा संगम आहे. त्यात भारताची व्हायब्रंट डेमॉक्रसी, युवा डेमोग्राफी आणि देशाचे डिजिटल रूपांतर यांचा समावेश आहे. दुसरी शक्ती म्हणजे दूरदर्शी आणि गतिशीलता असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व. येथे मी चार मुद्दे सांगू इच्छितो. पहिला-देशात किमान ३० कोटी लोक अजूनही 2 जी सेवा घेण्यास बाध्य आहेत. त्यांच्याकडे स्वस्त स्मार्टफोन असावा यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. दुसरा- भारत आज डिजिटल रूपाने जोडलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ देशांपैकी एक आहे. ते कायम राखण्यासाठी 5 जीच्या सुरुवातीच्या रोलआऊटमध्ये वेग आणण्यासाठी धोरणात्मक पावलांची गरज आहे. जिओ २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतात 5 जी क्रांतीचे नेतृत्व करेल. 5 जी नेटवर्कसोबतच हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशी असेल. तिसरा- 5 जी भारताला चौथ्या औद्याेगिक क्रांतीसाठी मजबूत तर बनवलेच, शिवाय त्याचे नेतृत्वही करेल. चौथा-देशाची अर्थव्यवस्था आणि समाजात डिजिटायझेशनला गती येईल, तसतसे देशाच्या गरजेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रात आपण मोठ्या प्रमाणावर आयातीवर विसंबून राहू शकणार नाही.

5 जी तंत्रज्ञानाने भारताला खूप फायदा होईल : मित्तल
भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल म्हणाले की, भारत आगामी दोन-तीन वर्षांत 5जी तंत्रज्ञानाची मानके आणि इको सिस्टीमचा फायदा घेईल. कारण उपकरणांची किंमत कमी होईल आणि उपकरणे बाजारात उपलब्ध होतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser