आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गुंतवणूक:जिओ लाँच करणार 5-जी तंत्रज्ञान; गुगलच्या सहकार्याने स्वस्त फोनही

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तंत्रज्ञानात नवीन क्रांती...जिओ ग्लासने पाहता येईल फोनवर थ्रीडी व्ह्यू

रिलायन्स जिओ अमेरिकेची दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगलच्या सहकार्याने भारतात स्वस्त ४-जी आणि ५-जी फोनची निर्मिती करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या ४३व्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. अंबानी म्हणाले, जिओ प्लॅटफॉर्मनुसार जिओ ग्लासचीही निर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून थ्रीडी व्ह्यू पाहता येईल. देशात ५-जी सेवा लाँच करण्याची घोषणाही अंबानी यांनी केली. जिओ मिट अॅपच्या माध्यमातून आयोजित कंपनीच्या पहिल्या व्हर्च्युअल सभेत बोलताना अंबानी म्हणाले, कंपनीचा डिजिटल जिओ प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज आयटी कंपनी गुगल ३३,७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या मोबदल्यात गुगलला ७.७% भागीदारी मिळणार आहे. सौदी अरामकोशी बहुप्रतीक्षित कराराबाबत अंबानी म्हणाले, काही अनपेक्षित कारणांमुळे या करारावर पुढे काही काम होऊ शकलेले नाही. पुढे जिओ मार्ट इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, फॅशन आणि हेल्थकेअर या क्षेत्रातही प्रवेश केला जाईल, अशी घोषणाही अंबानी यांनी केली.

जिओ ग्लास :

जिओ ग्लास व्हर्च्युअल असिस्टंटने परिपूर्ण असेल. एका केबलसोबत हा ग्लास येतो. तो केबलने स्मार्टफोनला जोडता येतो. याचे वजन ७५ ग्रॅम आहे. जिओने या स्मार्ट ग्लासच्या ग्राफिक्सवर खूप मोठ्या प्रमाणात काम केले आहे. या वेळी जिओ ग्लासचा डेमोही दाखवण्यात आला. जिओ ग्लासच्या माध्यमातून तुम्ही एका वेळी दोघांना व्हिडिओ कॉल करू शकाल. जिओचा हा स्मार्ट ग्लास थ्रीडी होलोग्राफिक व्हिडिओ कॉलला सपोर्ट देतो. म्हणजे व्हिडिओ कॉल करताना तुम्ही समोरच्या व्यक्तीला थ्रीडी रूपात पाहू शकाल.

५-जीमध्ये देशी तंत्रज्ञान, २० वर स्टार्टअपची मदत

गुगल आणि जिओ यांनी एकत्रितपणे एक अँड्रॉइड स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्याचे निश्चित केले आहे. मोफत २-जीची घोषणा करताना अंबानी यांनी सांगितले की, २-जी फीचर फोन असलेल्या युजर्सनी स्मार्टफोन वापरावेत, असा प्रयत्न केला जाईल. अंबानी म्हणाले, कंपनीने ५-जी नेटवर्क तयार केले असून ते जगातील सर्वात दर्जेदार ५-जी नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये देशी उपकरणांचाच वापर केला असल्याचा दावाही अंबानी यांनी केला. यासाठी २० हून अधिक स्टार्टअपची मदत घेतली असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले.