आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉब कोच:भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व देतात रिक्रूटर्स

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांच्या मते, सर्वात यशस्वी बॉसमध्ये एक गुण समान असतो तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. नेतृत्वासाठी भावनिक बुद्धिमत्ता ही एक आवश्यक अट असल्याचे अनेक अभ्यासात असे आढळून आले. करिअर बिल्डरच्या सर्वेक्षणात ७५ टक्के हायरिंग मॅनेजर्स, कर्मचाऱ्यात बुद्धिमत्तेपेक्षा जास्त भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व देतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता. मानसशास्त्रज्ञ पीटर सालोवे यांच्या मते, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची आणि समजून घेण्याची क्षमता. यामुळे निर्णय घेणे आणि कामाच्या ठिकाणी समस्या सोडवणे सोपे जाते. टॅलेंट स्मार्ट ईक्यूच्या संशोधनानुसार, जे व्यावसायिक भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असतात ते इतरांपेक्षा अधिक कमावतात. हे तुम्हाला एक उत्तम संवादक आणि नेता बनवते.

कामाच्या ठिकाणी टीमवर्कची भावना वाढते यशस्वी उद्योजक गॅरी वायनरचुक म्हणतात की, तुमच्याकडे चांगल्या कल्पना असतील मात्र भावनिक बुद्धिमत्ता नसेल तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकणार नाही. व्यावसायिक जीवनातील प्रगतीसाठी एक अतिशय महत्त्वाचे कौशल्य बनले आहे. राइस युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंट आणि सायकोलॉजीच्या प्रोफेसर जेनिफर जॉर्ज यांच्या मते, भावनिक बुद्धिमत्ता सहकाऱ्यांमधील नातेसंबंध मजबूत करते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी टीमवर्कची भावना वाढते.

सामाजिक संवादात वाढवा भागीदारी गेल्या वर्षी वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने भावनिक बुद्धिमत्तेला टॉप १० नोकरी कौशल्यात ठेवले होते. अशा परिस्थितीत अत्यावश्यक नोकरीचे कौशल्य बनले आहे. तुम्हाला तुमची भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर सर्वप्रथम तुमच्या स्वतःच्या भावना जाणून घ्या. तुमच्या भावनांचा तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो का याचा विचार करा. सामाजिक संवादात सहभाग वाढवा. इतरांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

बातम्या आणखी आहेत...