आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट नोकऱ्यामध्‍ये वाढ:नोकरी बाजारात तेजी, मेमध्ये नोकऱ्यांमध्ये 9% वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चालू आर्थिक वर्षात नोकरीच्या बाजारपेठेत सलग दुसऱ्या महिन्यात वाढ दिसून आली आहे. सर्व क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासह रोजगाराच्या बाबतीत देशाने कोविडपूर्व स्तरावर पोहोचण्याचा खूप मोठा पल्ला गाठला आहे. मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सनुसार (एमईआय) मे महिन्यात कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये वार्षिक ९% वाढ झाली आहे.

एमईआयच्या दृष्टीने वाढत्या महागाईचा परिणाम नोकरीच्या बाजारावरही झाला आहे. गेल्या महिन्यात, मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स एप्रिलच्या तुलनेत ४% खाली होता. याचाच अर्थ कंपन्यांनी नवीन कर्मचारी नियुक्त करताना थोडी सावधगिरी बाळगली आहे. हा निर्देशांक ज्या २७ उद्योगांमध्ये रोजगाराची स्थिती दर्शवतो, त्यापैकी २२ उद्योगांमध्ये एक वर्षापूर्वीच्या तुलनेत नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. या संदर्भात दूरसंचार, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा आणि आयात-निर्यात या क्षेत्रांनी सर्वोत्तम कामगिरी केली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मोठ्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी वाढण्यासोबतच टियर-२ शहरांमध्येही गेल्या महिन्यात नोकऱ्यांमध्ये चांगली वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...