आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची तिसरी लाट असूनही, देशातील आयटी क्षेत्रात हायरिंगचे प्रमाण मजबूत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 2022 मध्ये IT क्षेत्रातील कंपन्यांनी 70 हजार पदांसाठी भरती केली आहे. लिंक्डइन आणि स्टाफिंग फर्म एक्सफेनोच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे.
वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या सुट्ट्या संपल्यानंतर कंपन्यांमध्ये काम सुरू करण्याची गती मंदावलेली असते, मात्र यावेळी तेजी आहे. सुरुवातीची गती कायम राहिल्यास जानेवारीमध्ये नोकरीची संधी डिसेंबर (2.53 लाख) पेक्षा जास्त असू शकते. असे झाल्यास दोन वर्षांनंतरचा हा उच्चांक असेल.
पाच लाखांपर्यंत पोहोचेल हायरिंग
एक्सफेनोचे सह-संस्थापक कमल कारंत यांच्या मते, जानेवारी-मार्च तिमाही नोकऱ्यांसाठी उत्साहजनक राहते. यावेळची सुरुवातच उत्साहवर्धक आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन जॉब ऑफर असलेल्या टॉप आयटी आणि टेक कंपन्या म्हणजे Accenture, IBM, Genpact, Dell, Zensar, Salesforce आणि Oracle आहेत. एक्सफेनोचा अंदाज आहे की 2021-22 या आर्थिक वर्षात TCS, Infosys सारख्या टॉप-10 भारतीय IT कंपन्यांची हायरिंग पाच लाखांपर्यंत पोहोचेल.
मोठ्या कंपन्यांमध्ये 61 हजार भरती
आयटी सेक्टरच्या देशात चार प्रमुख कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रोने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या तिमारी दरम्यान 61,137 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. टीसीएसने 28,238 इन्फोसिसने 12,450, एचसीएलने 10143 आणि विप्रोने 10,306 कर्मचाऱ्यांना हायर केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.