आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Job Employment, IT Alone Doubles Recruitment From 5 Big Sectors, 52 % Women In Health Sector Update And Latest News  

जाने-मार्च 2022 मध्ये 3.5 लाख कर्मचारी वाढले:5 मोठ्या क्षेत्रांपैकी एकट्या IT क्षेत्रात 3 महिन्यात दुप्पट भरती; आरोग्यात 52% महिला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

या वर्षातील पहिले तीन महिने आयटी क्षेत्रासाठी सर्वोत्तम ठरले आहेत. या कालावधीत 5 मुख्य क्षेत्रांमध्ये (आरोग्य, वाहतूक, व्यवसाय, आर्थिक सेवा आणि रेस्टॉरंट-निवास) जेवढी भरती झाली नाही. तेवढी नोकर भरती एकट्या आयटी/बीपीओ क्षेत्रात झाली आहे.

जानेवारी-मार्च 2022 मध्ये या 5 क्षेत्रांमध्ये एकूण 1.48 लाख कर्मचारी वाढले आहेत. तर एकट्या IT/BPO मध्ये 3.74 लाख कर्मचारी वाढले आहेत.

त्याचवेळी याच कालावधीत शिक्षण, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये घट झाली आहे. 1.44 लाख कामगार उत्पादन क्षेत्रात, 22 हजारांहून अधिक शिक्षण आणि सुमारे 9 हजार कर्मचारी बांधकाम क्षेत्रात कमी झालेले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणात हे चित्र समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार जानेवारी-मार्च 2022 मध्ये IT/BPO मध्ये 38.31 लाख कर्मचारी होते. तर ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मध्ये ही संख्या 34.56 लाख होती.

त्रैमासिक (जानेवारी-मार्च 2022) रोजगार सर्वेक्षणानुसार, आरोग्य क्षेत्रातील महिला कर्मचार्‍यांचा वाटा 52% वर गेला. म्हणजेच त्यांनी पुरूषांना देखील मागे टाकले आहे.

 • महिला कर्मचाऱ्यांचा वाटा 44% शिक्षणात, 41% वित्तीय सेवा आणि 36% IT/BPO मध्ये आहे.
 • एप्रिल-जून 2021 या तिमाहीत 9 प्रमुख क्षेत्रांमध्ये एकूण कर्मचार्‍यांपैकी 29.30% महिलांचा वाटा होता. जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत 31.77% पर्यंत वाढला.
 • 500 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांचा सर्वाधिक वाटा सुमारे 40% आहे. तर सुमारे 37% कंपन्यांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत.

नियमित कर्मचारी ठेवण्यात शिक्षण, वाहतूक टॉप- थ्री

 • IT/BPO क्षेत्रात सर्वाधिक नियमित कर्मचारी आहेत (94.69%). या यादीत परिवहन दुसऱ्या (91.89%) आणि शिक्षण तिसऱ्या क्रमांकावर (91.14%) आहे.
 • बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक कर्मचारी (19.04%) करारावर काम करतात. या संदर्भात मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्या (12.38%) आणि आरोग्य तिसऱ्या क्रमांकावर आहे (9.08%).
 • बांधकामात दैनंदिन किंवा अर्धवेळ कामगारांची कमाल संख्या 5,69% आहे. उत्पादन दुसऱ्या क्रमांकावर (3.96%) आणि वित्तीय सेवा क्षेत्र (3.6%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • सर्व नऊ क्षेत्रांमध्ये एकूण 86.42% कर्मचारी नियमित आणि 8.66% कंत्राटी पद्धतीने काम करतात.
बातम्या आणखी आहेत...