आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टाळेबंदी संंपुष्टात आल्यानंतर आणि कोरोना काळादरम्यान पाच क्षेत्रांत येत्या तिमाही(जुलै-सप्टेंबर)त देशात नोकऱ्यांचा मार्ग मोकळा होईल. यामध्ये खाण, बांधकाम, वित्त, विमा आणि रिअल इस्टेचा समावेश आहे. मंगळवारी जारी नियोक्त्यांच्या पाहणीत हा दावा करण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या मॅनपॉवर ग्रुपने देशाच्या ६५० मोठ्या ग्राहकांच्या चर्चेवर आधारित हा सर्वेक्षण अहवाल तयार केला आहे.
मॅनपॉवर ग्रुपच्या वतीने जारी निवेदनात म्हटले की, नियुक्ती प्रकरणात सकारात्मक ट्रेंड दाखवणाऱ्या जगातील ४४ देशांमध्ये भारत अव्वल ४ मध्ये आहे. क्षेत्रीय आधारावर सांगायचे झाल्यास पश्चिम व पूर्व भागाच्या तुलनेत उत्तर व दक्षिण भारतीय राज्यांत जास्त नियुक्त्या होतील. मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे समूह व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांच्यानुसार, आतापर्यंत कॉर्पाेरेट इंडिया अापल्या मनुष्यबळास कोरोना संकटानुरूप रूपांतरित करत आहे. ही वास्तवात वेट अँड वॉचची स्थिती आहे, जिथे संस्था टाळेबंदी उघडल्यानंतर संभाव्य मागणी लक्षात घेता तयारी करत आहेत.
मॅन्युफॅक्चरिंग, सेवा क्षेत्र राहील सौम्य
दुसरीकडे, ज्या क्षेत्रात नोकऱ्या कमी राहण्याचा अंदाज आहे, त्यात मॅन्युफॅक्चरिंग, सेवा प्रमुख आहेत. या क्षेत्रात नियोक्ताही सध्या सांभाळून नियुक्त्या सुरू करतील. अहवालात हेही सांगितले की, कोरोना विषाणूनंतर लागू टाळेबंदीमुळे सर्वात जास्त ठोक आणि रिटेल व्यवसाय प्रभावित झाला आहे. टाळेबंदीमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे जवळपास ८८ टक्के नियोक्त्यांनी मान्य केले आहे.
हे समजून घ्या: अखेर या पाच विशेष क्षेत्रांत नव्या नियुक्त्यांत तेजी का येईल...
मायनिंगमध्ये सर्वात मोठा हिस्सा कोळशाचा आहे. नुकतेच सरकारने कोळशावरील सरकारी एकाधिकारशाही संपवली आहे. यामुळे कोळशाच्या खाणीत वेगाने वाढ होण्याची आशा आहे. दुसरीकडे,बांधकाम सुरू झाल्याने खाण उत्पादनात वाढ पाहावयास मिळेल.
भारतातील लोक आशावादी आहेत आणि सरकारच्या पॅकेजमुळे सर्व क्षेत्रांच्या अार्थिक उत्पादनांत तेजी पाहायला मिळू शकते. सरकारचे लक्ष रोजगाराच्या प्रमाणावरही अवलंबून आहे. हे सर्व तत्त्व वित्त वर्ष समाप्त होण्याआधीपासून नोकरीची अपेक्षा ठेवणाऱ्या लोकांसाठी आशेचा किरण आणू शकते. - संदीप गुलाटी, समूह प्रबंध संचालक, मॅनपॉवर ग्रुप इंडिया
कोरोना काळात अनेक अशा योजनाही ठप्प झाल्या होत्या, ज्यांच्यावर काम सुरू झाले होते. अनेक योजना पाइपलाइनमध्ये असल्याने आता या नव्याने सुरू होतील.
सरकारच्या घोषणेनंतर रेराने डेव्हलपर्सना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचीच सवलत दिली आहे. अशा स्थितीत त्यांना आपले काम लवकर सुरू करावे लागेल.
कोरोना विषाणूचा काळ सुरू झाल्यानंतर विमा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हा काळ आणखी पुढेही सुरू राहील.
व्यावसायिक उत्पादन नव्याने सुरू झाले. अशा स्थितीत पुन्हा कर्ज घेणे आणि फेडण्याचा कल सुरू होईल आणि काम वाढेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.