आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिलिकॉन व्हॅली बँकेचे संकट अमेरिकन सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सोमवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याचा व्हिडिओ पाहता सरकारकडे या संकटाला सामोरे जाण्यासाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचे दिसते. सोमवारी सिलिकॉन व्हॅली बँक संकटावर बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये बायडेन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता परिषदेमधून निघून गेले.
हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पत्रकार परिषद अर्धवट सोडून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी चीनच्या "स्पाय बलून" घटनेवर वक्तव्य दिल्यानंतर पत्रकारांनी बायडेन यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यानंतरही बायडेन प्रश्नांची उत्तरे न देता परिषद सोडून गेले.
काय आहे या व्हिडिओमध्ये
अध्यक्ष जो बायडेन "एक लवचिक बँकिंग प्रणाली राखणे व ऐतिहासिक आर्थिक पुनर्प्राप्तीचे संरक्षण" यावर बोलत होते. त्यांचे भाषण संपल्यानंतर पत्रकारांनी प्रेसिडेंट बायडेन यांना विचारले. आता तुम्हाला याविषयी (सिलिकॉन व्हॅली बँक क्रायसिस) काय माहिती आहे, असे का झाले? आणि भविष्यात असे होणार नाही याची खात्री तुम्ही अमेरिकन लोकांना देऊ शकता का?, पण बायडेन यांनी प्रश्नांचे उत्तर न देता निघून गेले.
पत्रकाराला म्हटले होते- 'कुत्रीचा मुलगा'
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात मायक्रोफनवर पत्रकाराला अपशब्द वापरले होते. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या फोटो सेशनच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टरला थेट मायक्रोफोनवर 'कुत्रीचा मुलगा' असे संबोधले. याचे मुळ कारण होते की, देशातील सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे मध्यावधी निवडणुकीत तुमच्या पक्षाचे किती नुकसान होईल, असा प्रश्न पत्रकाराने त्यांना विचारला आहे. त्यावर बायडेन यांनी आम्हाला काहीही नुकसान होणार नाही, असे म्हणत 'स्टुपिड सन ऑफ बिच' असे म्हटले.
देशाची आर्थिक व्यवस्था सुरक्षित : राष्ट्राध्यक्ष बायडेन
सोमवारीच राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी देशाची आर्थिक व्यवस्था सुरक्षित असल्याचे सांगितले होते. आम्ही वचन देतो की सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पडझडीमुळे होणारे कोणतेही नुकसान करदात्यांना दिले जाणार नाही. बायडेन प्रशासन अलास्काच्या पेट्रोलियम-समृद्ध नॉर्थ स्लोपवरील मेजर विलो ऑइल प्रकल्पास मान्यता देत आहे.
HSBC ने सिलिकॉन व्हॅली बॅंक विकत घेतली
HSBC ने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेचे यूके युनिट विकत घेतले आहे. हा सौदा फक्त 1 पौंड म्हणजेच सुमारे 99 रुपयांना झाला आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेचे संपूर्ण कर्ज सरकारच्या पाठिशी असल्याने अधिग्रहण किंमत केवळ नावावर आहे. म्हणजेच एचएसबीसीला या करारानंतर कोणतेही कर्ज फेडावे लागणार नाही.
HSBC ने सांगितले की 10 मार्च पर्यंत, सिलिकॉन व्हॅली बँक यूके लिमिटेडकडे सुमारे £5.5 अब्ज कर्ज आणि सुमारे £6.7 अब्ज ठेवी होत्या. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, SVB UK ने £88 दशलक्ष करपूर्व नफा नोंदवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.