आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटी रुपयांची ऑफर:अंबुजा आणि एसीसीसाठी जेएसडब्ल्यूची 54,000 कोटी रुपयांची ऑफर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेएसडब्ल्यू समूहाने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी हाेल्सिम जी ची भारतीय उपकंपनी अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीमधील ६३% हिस्सा खरेदी करण्यासाठी ५४,००० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी सांगितले की, त्यांची कंपनी खासगी इक्विटी भागीदारांच्या मदतीने ३४,००० कोटी रुपये स्वत:च्या इक्विटीमध्ये आणि २०,००० कोटी रुपये अंबुजा सिमेंट आणि एसीसीसाठी देऊ करेल.जिंदाल यांनी प्रायव्हेट इक्विटी (पीई) भागीदारांचे नाव उघड केले नाही. माहितीनुसार, अमेरिकन पीई कंपनी अपोलोने या अधिग्रहणासाठी जेएसडब्ल्यूला ७,००० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. जेएसडब्ल्यू समूह हे संपादन करण्यात यशस्वी ठरल्यास सिमेंट बाजारपेठेतील त्याचा हिस्सा सध्याच्या ३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत वाढेल. परंतु बँकिंग सूत्रांनुसार, जेएसडब्ल्यू समूह या अधिग्रहणाच्या शर्यतीत अदानी समूहापेक्षा खूप मागे आहे, ज्याने ७७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची ऑफर दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...