आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुलै-सप्टेंबरदरम्यान देशात इलेक्ट्रॉनिक पेमेंटद्वारे ३८.३२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या कालावधीत डेबिट-क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेट्स आणि प्रीपेड कार्ड यांसारख्या प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे एकूण २३०६ कोटी व्यवहार केले गेले. हे जून तिमाहीच्या तुलनेत मूल्याच्या दृष्टीने ६.२% आणि व्यवहारांच्या संख्येच्या बाबतीत १२.१% ने जास्त आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत ३६.०८ लाख कोटी रुपयांचे एकूण २०५७ कोटी व्यवहार इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोडद्वारे झाले. वर्ल्डलाइन इंडियाने सोमवारी जारी केलेल्या इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्ट क्यू ३-२०२२ मधून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, यूपीआय हे लोकांमध्ये डिजिटल पेमेंटचे सर्वाधिक पसंतीचे माध्यम राहिले. एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआयचा वाटा ८५% आहे. सप्टेंबर तिमाहीत एकूण १९६५ कोटी रुपयांचे ३२.५ लाख कोटी व्यवहार यूपीआयद्वारे झाले.
प्रति डिजिटल व्यवहार सरासरी रक्कम क्रेडिट कार्ड ४,८२३ डेबिट कार्ड २,०७३ यूपीआय (पर्सन टू मर्चंट) ७३८ यूपीआय (पर्सन टू पर्सन) २,५७६ प्रीपेड कार्ड ४७३ एम-वॉलेट ३८२ आकडे रुपयांत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.