आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:काेडॅकने कॅमेरा व्यवसाय बंद झाल्यानंतर जेनेरिक औषधात ठेवले पाऊल, शेअर्स ६०%पर्यंत उसळले

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी सरकारने कंपनीला क्षमता विस्तारासाठी ५,७३७.५ कोटींचे कर्ज केले मंजूर
  • डिजिटल फोटोग्राफीत मागे पडल्याने बाजारातून बाहेर पडली कोडॅक

ईस्टमॅन कोडॅक कंपनी जगभरात कॅमेरा निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. असे असले तरी डिजिटल युगात कंपनी पारंपरिक कॅमेऱ्याचा व्यवसाय चालवू शकली नाही आणि तिला व्यवसाय बंद करावा लागला. मात्र, जवळपास एका दशकानंतर कंपनीसाठी “कोडॅक मोमेंट’चे पुनरागमन झाले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, कोराेनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी फोटोग्राफी इंडस्ट्री जेनेरिक औषध निर्मितीसाठी आवश्यक अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडिएंट्स(एपीआय) तयार करू शकते. यानंतर कोडॅकने औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले होते. आता कोडॅकला आैषधांसाठीचे घटक बनवण्यासाठी अमेरिकी सरकारने ७६.५ कोटी डॉलर(सुमारे ५,७३७.५ कोटी रुपये)चे कर्ज मंजूर केले आहे. या पावलाचा उद्देश औषधांच्या पुरवठ्यासाठी अमेरिकेचे अन्य देशांवरील अवलंबित्व कमी करणे आहे. कोडॅक कर्जाच्या रकमेचा उपयोग रोचेस्टर, न्यूयॉर्क आणि सेंट पॉल, मिनोसिटास्थित आपल्या प्रकल्पांचा विस्तार करण्याचा आहे. या वृत्तानंतर अमेरिकी शेअर बाजारात मंगळवारी कोडॅकचे शेअर्स ६०% वाढीसह बंद झाले. व्यवसायादरम्यान शेअरमध्ये तिपटीपर्यंत उसळी दिसली.

कोडॅक फार्मास्युटिकल्सच्या लाँचिंगनिमित्त कंपनीचे चेअरमन जिम कॉन्टिनेंजा म्हणाले, कंपनी मोठ्या प्रमाणावर एपीआयचे उत्पादन केवळ तीन ते चार वर्षांत करेल. अमेरिकेत जेनेरिक औषध निर्मितीसाठी आवश्यक २५% एपीआयची निर्मिती कोडॅकच्या प्लँटमध्ये होऊ शकेल. दुसरीकडे, यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पचे प्रमुख अॅड बॉयलर म्हणाले, औषधांच्या संदर्भात पाहिल्यास अमेरिकेत जेवढ्या औषधांचा वापर होतो त्यापैकी ९०% औषधी जेनेरिक आहेत. यामध्ये जवळपास सर्व देश बाहेरून येतात. जेनेरिक औषधांसाठी एपीआय निर्मितीत जगाच्या बाजारात चीनचे वर्चस्व आहे. यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

डिजिटल फोटोग्राफीत मागे पडल्याने बाजारातून बाहेर पडली कोडॅक

ईस्टमन कोडॅक कंपनीची स्थापना जॉर्ज ईस्टमनने १८८८ मध्ये केली होती. ब्राउनी बॉक्स याच्या सर्वात लोकप्रिय कॅमेऱ्यांपैकी एक होता. याने कोडॅकला फोटोग्राफी इंडस्ट्रीची प्रमुख कंपनी बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. कोडॅकने पहिला सेल्फ कटेन्ड डिजिटल कॅमेरा विकसित केला होता. असे असतानाही डिजिटल फोटोग्राफी स्वीकारण्याचा पुढाकार खूप उशिराने घेतला. परिणामी १९९० दशकाच्या अखेरपर्यंत कंपनी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होती. २०१२ मध्ये कंपनीने आपला फोकस प्रिंटिंग आणि कंपन्यांच्या व्यावसायिक सेवा देण्यावर केंद्रित केला होता. यासोबत कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.