आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Kaivalya Vohra |Stanford Dropout, Started A Startup With The Idea Of 'Delivery In 10 Minutes'

कैवल्य वोहरा (चर्चेतील व्यक्तिमत्त्व ):स्टॅनफोर्डचे शिक्षण सोडले, ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’ कल्पनेने सुरू केले स्टार्टअप

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९ वर्षीय कैवल्य वोहरा हुरून रिच लिस्टच्या १००० कोटी क्लबमध्ये समाविष्ट होणारे सर्वात तरुण भारतीय ठरले आहेत. जन्म - १५ मार्च २००३ शिक्षण - स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून ड्रॉपआउट, दुबई कॉलेजमधून शालेय शिक्षम मालमत्ता - १००० कोटी

१९ वर्षीय कैवल्य वोहरा भारतातील सर्वात श्रीमंत तरुण ठरले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयआयएफएल वेल्थ हुरून रिच लिस्टमध्ये कैवल्य १०३६ व्या क्रमांकावर आहेत. झेप्टो या किराणा डिलिव्हरी अॅपचे संस्थापक कैवल्य वोहरा यांच्या संपत्तीने १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २०२१ मध्ये कैवल्य यांनी बालपणीचा मित्र आदित पलिचासोबत झेप्टोची सुरुवात केली. हा किराणा माल वितरण प्लॅटफॉर्म आहे. दोघेही भारतातील सर्वात तरुण स्टार्टअप संस्थापक आहेत, आदितचे वयदेखील २० वर्षे आहे आणि त्यांची एकूण संपत्ती सुमारे १२०० कोटी आहे, परंतु कैवल्यच्या वयामुळे त्यांचे नाव हुरून यादीत सर्वात वर आहे. लाँच केल्यानंतर अवघ्या वर्षभरात झेप्टोची एकूण संपत्ती ७ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. सध्या झेप्टो भारतातील १० प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनीत सुमारे १,००० कर्मचारी आणि डिलिव्हरी बॉय काम करतात. प्लॅटफॉर्मवर ३,००० उत्पादने वितरित केली जातात. यामध्ये फळे, भाज्यांपासून स्वयंपाकाचे पदार्थ, आरोग्य-स्वच्छता उत्पादने आहेत. लाँचिंगच्या वेळी झेप्टोने १० मिनिटांत डिलिव्हरीचे आश्वासन दिले होते. नंतर ते ‘डिलिव्हरी इन मिनिट’ असे झाले.

शिक्षण आणि कुटुंब दुबईतून शालेय शिक्षण, स्टॅनफोर्डचे शिक्षण सोडले कैवल्य यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. दुबई कॉलेज नावाच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच कैवल्य यांना गणित आणि संगणकशास्त्रात खूप रस होता. या दोन्ही विषयांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली आहेत. अभ्यासासोबतच कैवल्य खेळातही खूप सक्रिय होते. शाळेच्या १९ वर्षांखालील बास्केटबॉल संघाचे ते कर्णधारही होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कैवल्य स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी घेत होते. संगणकशास्त्राचा अभ्यासही सुरू केला, पण २०२० मध्ये त्यांनी मित्र आदित पालिचासोबत स्टार्टअप सुरू करण्यासाठी कॉलेज सोडले.

झेप्टो अॅपचे संस्थापक आहेत कैव‍ल्य वोहरा रंजक : स्टार्टअपची कल्पना महामारीच्या काळात सुचली २०२० मध्ये कैवल्य वोहरा आदितसोबत मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्या काळात कोरोनामुळे किराणा सामान मिळण्यात खूप अडचणी येत होत्या. किराणा डिलिव्हरीसाठी ३ ते ४ दिवस लागत असल्याने दोघेही हतबल झाले होते. मग त्यांना झेप्टोची कल्पना सुचली. लॉकडाऊनच्या काळात त्यांना वाटले की, देशाला अत्यावश्यक गरजांसाठी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची गरज आहे. आणि त्यासाठी दोघांनी किराणा डिलिव्हरी स्टार्टअप सुरू केले. २०२० मध्ये दोन्ही मित्रांनी मिळून किराणाकार्ट नावाचे स्टार्टअप सुरू केले. ऑनलाइन वितरणासाठी किराणा दुकानांशी भागीदारी करणारे हे एक स्टार्टअप होते. मात्र, गुंतवणूकदारांच्या कमतरतेमुळे किराणाकार्ट २०२१ मध्ये बंद करावे लागले.

व्यवसाय : १० मिनिटांत किराणा वितरित करते झेप्टो किराणाकार्ट बंद झाल्यानंतर २०२१ मध्ये कैवल्य आणि आदित यांनी झेप्टो सुरू केले. झेप्टो नावाचा अर्थ ‘झेप्टोसेकंद’ हे काळाचे एक छोटेसे एकक आहे. त्याच्या नावाप्रमाणेच झेप्टो काही मिनिटांत किराणा माल वितरणाचे वचन देते. झेप्टोचे वैशिष्ट्य म्हणजे ते १० मिनिटांत किराणा सामान पोहोचवते. स्विगी, इन्स्टामार्ट, ग्राॅफर्स आणि डुनझोसारखे मोठे अॅप्स या क्षेत्रात अस्तित्वात आहेत, पण या सर्व आव्हानांना न जुमानता झेप्टोने व्यवसायात मोठी वाढ केली आहे. प्लॅटफॉर्मने नोव्हेंबर २०२१ मध्ये निधीद्वारे ४८६ कोटी जमा केले. डिसेंबरमध्ये आणखी एका फंडिंग फेरीत ८१० कोटी जमा झाले. यावर्षी मेपर्यंत त्याचे मूल्यांकन ७३०० कोटींवर गेले आहे. आज झेप्टो १० प्रमुख शहरांमध्ये वितरण करत आहे. यात अनेक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे, त्यांची संख्या सुमारे ३००० आहे.

कैवल्य यांच्या झेप्टो डिलिव्हरी स्टार्टअपबद्दल जाणून घ्या... २०२१ मध्ये झेप्टोची सुरुवात १० मोठ्या शहरांत सक्रिय ३००० उत्पादनांचे वितरण ७३०० कोटी रु. झेप्टोचे मूल्यांकन

बातम्या आणखी आहेत...