आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala State Auto Driver Wins Rs 25 Crore I Onam Bumper Lottery I Latest News And Update  

याला म्हणतात नशीब:केरळमधील रिक्षाचालकाला लागली तब्बल 25 कोटींची लॉटरी; शेफ बनण्यासाठी काढले होते कर्ज

तिरुवनंतपुरम9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नशीब म्हणजे काय असते, असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्यांना हे केरळमधील या रिक्षाचालकाचे उदाहरण नक्कीच देता येईल. केरळमधील अ‌ॅटोरिक्षाचालक असलेले अनुप यांना तब्बल 25 कोटींची लॉटरी लागली आहे. त्यामुळे रिक्षाचालक अनुप यांचे नशीब चांगलेच चमकले आहे.

ओणम बंपर लॉटरीत त्यांना 25 कोटींचे बक्षीस मिळाले आहे. तिरुअनंतपुरममधील श्रीवरहम येथे राहणाऱ्या अनूपने शनिवारी रात्री या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ज्याचा निकाल रविवारी जाहीर झाला. कर कपात केल्यानंतर अनुप यांना 15.75 कोटी रुपये मिळणार आहेत. लॉटरी लागल्यानंतर अनुप यांच्या कुटुंबियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

शेफ बनण्यासाठी मलेशियाला जाण्यासाठी कर्ज काढले होते

ऑटोरिक्षा चालवण्यापूर्वी तो एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. पुन्हा आचारी म्हणून काम करण्यासाठी मलेशियाला जाण्याच्या तयारीत अनुप तयारी करित होता. मलेशियाला जाण्यासाठी अनुप यांना बॅंकेचे कर्जही मंजूर झाले होते. यानंतर त्यांनी 500 रुपयांना लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्यावर बंपर लॉटरी निघाली.

केरळच्या लॉटरी इतिहासातील सर्वात मोठे बक्षीस
केरळच्या इतिहासातील अनुप यांना लागलेले बक्षीस हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पारितोषीक आहे. प्रथम पारितोषीक 25 कोटी, द्वितीय 5 कोटी आणि तृतीय बक्षीस म्हणून 10 जणांना 1-1 कोटी देण्यात आले. तिकीट विकणाऱ्या एजंटला लॉटरीच्या बक्षीसातून कमिशनही दिले जाईल. या वर्षी केरळमध्ये 67 लाख ओणम बंपर लॉटरीची तिकिटे छापण्यात आली होती, त्यातील जवळपास सर्वच तिकिटे विक्री गेली होती.

कर्मचारी म्हणाले- अनुप यांना पहिले तिकीट आवडले नाही, पुन्हा दुसरे घेतले

शेफ बनण्यासाठी अनुपने काही दिवसांपूर्वीच कर्ज काढले होते. त्यासाठी तीन लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. त्याचे कर्जही मंजूर झाले. मात्र, त्यानंतर एका दिवसात त्याचे नशीब बदलले. ही व्यक्ती एका रात्रीत करोडपती झाली. 32 वर्षीय अनूप असे लॉटरी लागलेल्या तरुणाचे नाव आहे. हे तिकीट तिरुअनंतपुरममधील पझवांगडी भगवती एजन्सीमधून खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी अनुपने ज्या एजन्सीमधून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्या एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनी मीडिया कर्मचाऱ्यांना सांगितले की, अनुप यांनी घेतलेले पहिले तिकीट आवडले नाही. म्हणून दुसरे तिकीट खरेदी केले होते आणि त्याच तिकीटातून लॉटरी लागली.

22 वर्षांपासून लॉटरीची तिकीटे खरेदी करत असत

लॉटरी विजेता अनुप यांनी सांगितले की, गेल्या 22 वर्षांपासून मी लॉटरीची तिकिटे खरेदी करत असून आतापर्यंत काहीशे रुपयांपासून कमाल पाच हजार रुपयांपर्यंत बक्षीसाची रक्कम मिळाली आहे. "मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहत नव्हतो. पण जेव्हा मी माझा फोन पाहिला तेव्हा मला समजले की मी जिंकलो आहे. माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी ते माझ्या पत्नीला दाखवले. तेव्हा तिने सांगितले की हा लॉटरीचा विजयी क्रमांक आहे.

बातम्या आणखी आहेत...