आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mahindra Group Former Chairman Keshub Mahindra Passes Away | Keshub Mahindra Death |

दु:खद:महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे निधन, 1963-2012 या काळात होते ग्रुपचे प्रमुख

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज (12 एप्रिल) रोजी निधन झाले. 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1963 ते 2012 या काळात ते महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, केशब महिंद्रा हे सद्यस्थितीत एम अँड एम ग्रुपचे एमेरिटस अध्यक्ष होते. 1947 मध्ये त्यांनी M&M मध्ये पदार्पण केले.

केशब महिंद्रा होते जगातील सर्वात वृद्ध अब्जाधीश
आनंद महिंद्रा यांचे काका केशब महिंद्रा हे 1.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील सर्वात वयस्कर भारतीय अब्जाधीश होते. त्याच वर्षी फोर्ब्स मासिकाने जगभरातील अब्जाधीशांच्या जाहीर केलेल्या यादीत ही माहिती दिली होती. यापूर्वी 2007 मध्ये त्यांना 'अर्न्स्ट अँड यंग' कडून जीवनगौरव पुरस्कारही मिळाला होता.

अमेरिकेत शिक्षण घेतले
केशब महिंद्रा यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1947 मध्ये महिंद्रा कंपनीत रुजू झाले. प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर 1963 मध्ये त्यांना या समूहाचे अध्यक्ष करण्यात आले होते. ऑगस्ट 2012 पर्यंत ते या पदावर होते.

स्वातंत्र्यापूर्वीच कंपनीची झाली होती सुरूवात
जेव्हा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता, त्याच वेळी के. सी. महिंद्रा, जे. सी महिंद्रा आणि मलिक गुलाम मोहम्मद यांनी महिंद्रा अँड मोहम्मद नावाने कंपनी सुरू केली. 2 ऑक्टोबर 1945 रोजी लुधियाना, पंजाब येथे स्टील ट्रेडिंग कंपनी म्हणून त्याची सुरुवात झाली. जे. सी. महिंद्रा यांच्यावर नेहरू आणि गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. याच कारणामुळे गुलाम मोहम्मद यांचा कंपनीत अल्प हिस्सा असूनही त्यांचे नाव कंपनीच्या संस्थापकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. जेणेकरून एकतेचा संदेश देशातील लोकांपर्यंत पोहोचू शकेल.

विभाजनामुळे 'महिंद्रा अँड मोहम्मद' मधून कंपनी बनली महिंद्रा अॅंड महिंद्रा
देशाची फाळणी होताच गुलाम मोहम्मद यांनी कंपनीची नव्हे तर पाकिस्तानची निवड केली. ते पाकिस्तानात गेले आणि तिथले पहिले अर्थमंत्री म्हणून निवडून आले. पुढे 1951 मध्ये हे गुलाम मोहम्मद पाकिस्तानचे गव्हर्नरही झाले. इकडे गुलाम गेल्यानंतर कंपनीच्या व्यवसायावरही परिणाम झाला. कंपनीच्या नावावर बरीच चर्चा झाली होती, कारण कंपनीशी संबंधित सर्व स्टेशनरी M&M या नावाने छापली जात होती, अशा परिस्थितीत कंपनीचे नाव वेगळे करणे नुकसान होऊ शकते. शेवटी जे.सी कंपनीचा M&M टॅग कायम ठेवत महिंद्राने हुशारीने नाव महिंद्रा अँड मोहम्मद वरून बदलून महिंद्रा अँड महिंद्रा केले.