आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Kishore Biyani Is Preparing To Re enter Retail, Biyani Wants To Sell Some Of His Assets And Pay Off Debts.

व्‍यापाार:किशोर बियाणी रिटेलमध्ये पुन्हा प्रवेशाच्या तयारीत, बियाणी यांना आपली काही मालमत्ता विकून कर्ज फेडायचे आहे

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बाजार ब्रँडचे मालक असलेल्या फ्यूचर ग्रुपचे प्रवर्तक किशोर बियाणी पुन्हा रिटेल क्षेत्रात परतण्याचा विचार करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, किशोर बियाणी यांची फ्यूचर ग्रुपच्या काही मालमत्तांची पुनर्रचना आणि विक्री करून कर्ज फेडण्याची योजना आहे. फ्यूचर ग्रुपच्या कंपन्यांवर सुमारे २९,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे.

विशेष म्हणजे, अॅमेझॉनसोबतच्या वादामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला २५,००० कोटींना आपला व्यवसाय विकण्याची बियाणी यांची योजना अयशस्वी झाली. आता कर्ज फेडण्यासाठी बियाणी यांच्याकडे मालमत्ता विकण्याशिवाय पर्याय नाही. या प्रकरणातील तज्ज्ञांच्या मते, फ्युचर ग्रुपची कर्ज पुनर्गठनासोबत अनेक मालमत्ता विकण्याची योजना आहे.

बातम्या आणखी आहेत...