आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Starting Price Rs 79,900 I Knowing About Booking And Specifications Of IPhone 14 I Latest News And Update

आजपासून iPhone14 सीरीजचे प्री बुकिंग सुरू:सुरुवातीची किंमत 79,900 रुपये, जाणून फोनच्या बुकिंग अन् वैशिष्ट्याबद्दल

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयफोन - 14 सीरीजचे प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून (9 सप्टेंबर) सुरू होणार आहे. भारत, UAE, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएस आणि अन्य तीस देशांमध्ये संध्याकाळी 5:30 PM (IST) पासून iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि 14 Pro Max या चार मॉडेलची प्री ऑर्डर करता येणार आहे.

9 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू झाल्यानंतर, iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max च्या ऑर्डर 16 सप्टेंबरपासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. तथापि, iPhone 14 Plus ची डिलिव्हरी 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

आयफोन-14 सीरीजचे कसे बुकिंग करणार
ग्राहक त्यांची ऑर्डर अ‌ॅपल स्टोअर, जवळच्या अ‌ॅपल-अधिकृत पुनर्विक्रेता (मॅपल किंवा युनिकॉर्न) आणि रिलायन्स डिजीटल, क्रोमासारख्या इतर किरकोळ विक्रेत्यांवर 2,000 रुपये टोकन पैसे देऊन ऑनलाइन बुक करू शकतात.
6 मिळेल झटपट कॅशबॅक
Apple iPhone 14 सीरीजसाठी काही मनोरंजक लॉंच ऑफर देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या अधिकृत Apple Store वेबसाइटवर, HDFC बँक iPhone 14 आणि 14 Pro साठी क्रेडिट कार्डवर 6,000 रुपयांचा म्हणजेच 5% चा झटपट कॅशबॅक दिला जात आहे. यासोबतच iPhone-14 सीरीजच्या सर्व मॉडेल्ससाठी 6 महिन्यांपर्यंतचा नो-कॉस्ट EMI पर्यायही उपलब्ध आहे.

iPhone 14 सुरुवातीची किंमत 79,900 रुपये

 • आयफोन14 सीरीज 7 सप्टेंबर रोजी क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे लॉंच करण्यात आली. iPhone 14 मॉडेल 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.
 • त्यांची किंमत 79,900, 89,900 आणि 1,09,900 रुपये आहे. त्याच स्टोरेजसह iPhone 14 Plus देखील उपलब्ध आहे. त्यांची किंमत 89,900, 99,900 आणि 1,19,900 रुपये आहे.
 • iPhone 14 Pro Max ची किंमत 1,39,900 रुपयांपासून सुरू होते.
 • याशिवाय, iPhone 14 Pro मॉडेल 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.
 • त्यांची किंमत 1,29,900, 1,39,900, 1,59,900 आणि 1,79,900 रुपये आहे.
 • iPhone 14 Pro Max ची किंमत 1,39,900, 1,49,900, 1,69,900 आणि 1,89,900 रुपये आहे.

सीरीज 8, SE आणि अल्ट्रा वॉचचे बुकिंगही आजपासून सुरू

 • आयफोन-14 सीरीज व्यतिरिक्त, कंपनीने वॉच सीरीज 8, एसई, अल्ट्रा वॉच आणि एअरपॉड्स प्रो-2 (दुसरी पिढी) देखील लॉंच केली आहे. या सर्व उत्पादनांच्या प्री-ऑर्डरही आजपासून सुरू होत आहेत.
 • सीरीज 8 आणि SE वॉच 16 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील, तर अल्ट्रा वॉच आणि एअरपॉड्स प्रो सेकंड जनरेशन 23 सप्टेंबरपासून उपलब्ध होतील.
 • वॉच सीरीज 8 ची किंमत रु.45,900 आहे, SE ची किंमत रु.29,900 आहे. आणि अल्ट्राची किंमत रु.89,900 आहे. आहे. त्याचवेळी, एअरपॉड्स प्रो सेकंड जनरेशनची किंमत 26,900 रुपये आहे.
बातम्या आणखी आहेत...