आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलाच्या घटत्या किमती:कुवेतची रोकड संकटाने राखीव निधीतून गुजराण

कुवेत सिटी / फियोना मॅकडोनाल्डएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कच्चे तेल विकून आरामात आयुष्य व्यतीत करणाऱ्या आखाती देशातील दुसरा सर्वात श्रीमंत देश कुवेतवर आर्थिक संकट गडद होत आहे. कोविड-१९ आणि त्यामुळे घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे तेलाचे गणित बिघडले आहे. आता अनेक देशांवर अशी स्थिती ओढवली आहे की त्यांना राखीव निधीतून खर्च करावा लागत आहे. यासोबत त्यांना रोखे विकणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज घ्यावे लागत आहे. यामध्ये कुवेतची स्थिती सर्वात वाईट आहे. सौदी अरेबिया आणि अन्य देशांच्या उलट कुवेतच्या संसदेने आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. येथे सर्व कायद्यांसाठी लोकप्रतिनिधींची मंजुरी घ्यावी लागते.

खासदारांनी खर्च घटवण्याचा विरोध केला आहे. यामुळे रोकड संकट वाढले आहे. दीर्घावधीपासून कुवेतला आपल्या वेल्थ फंडावर भागवावे लागत आहे. कुवेतच्या अर्थसंकल्पाचा तीन चतुर्थांश हिस्सा सार्वजनिक क्षेत्रातील वेतन आणि सवलतीत खर्च होतो. सरकारकडे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. कुवेत सरकारला आपली संपत्ती रोकडच्या बदल्यात फ्यूचर जनरेशन फंडाकडे (एफजीएफ) तारण ठेवावी लागत आहे. हा फंड आखाती देशांनी भविष्यात तेल संपल्यानंतरच्या सुरक्षेसाठी तयार केला आहे. तारण ठेवलेल्या संपत्तीत कुवेत फायनान्स हाऊस, कुवेत पेट्रोलियम कॉर्पाेरेशन आणि टेलिकॉम कंपनी जेनचा समावेश आहे. सरकार सलग आठवी अर्थसंकल्पीय तूट कशी सहन करणार हे स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...