आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • KYC Fraud Alert By Reserve Bank Of India (RBI); All You Need To Know News And Live Updates

​​​​​​​फसवणुकीपासून सावध रहा:KYC च्या नावाने होत आहे फसवणूक, ग्राहकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये - आरबीआय

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँका आपल्याला खात्याच्या वैयक्तिक माहिती कधीच विचारत नाही

भारतात सध्या KYC च्या नावाने मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. अनेक ग्राहक या बनावट प्रकरणाला बळी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केवायसीच्या नावाने होणारी फसवणूक टाळण्याचा सल्ला दिला आहे. देशात अनेक प्रकरणे समोर आल्याने आरबीआयने या प्रकाराला बळी पडू नका असे म्हटले आहे.

केवायसीमुळे खात्यावर बंदी घालू नका
कोरोनाकाळात आरबीआयने केवायसीमुळे (नो युवर कस्टमर) कोणत्याही खात्यावर बंदी घालू नये असे सक्त आदेश दिले होते. या आदेशानुसार, जर एखाद्या खात्यात ग्राहकांची संपूर्ण नसली तरीही त्या खात्यावर कारवाई करता येणार नाही.

आपली माहिती कोणाला देऊ नका
आरबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करत म्हटले होते की, ग्राहकांनी केवायसीच्या बाबतीत फोन, एसएमएस किंवा ईमेलवर त्यांचे बँकिंग तपशील देऊ नका असे म्हटले आहे. यासोबत बँकेंचे तपशील जसे की, खाते लॉगिन तपशील, वैयक्तिक तपशील, केवायसी दस्तऐवज, कार्ड तपशील, पिन किंवा पासवर्ड, वन टाइम पासवर्ड (ओटीपी) अशी कोणलाही न देण्याचा सल्ला दिला आहे.

संकेतस्थळ आणि अॅपवर माहिती भरु नका
आपल्या बँकिंग संदर्भातील कोणतीही माहिती संकेतस्थळ किंवा अॅपवर देऊ नका. जर तुम्हाला अशी कोणी मागणी करत असेल तर बँक शाखेत जाऊन यासंबंधी माहिती देणे गरजेचे आहे. कारण केवायसी संदर्भांत अनेक तक्रारी आल्यानंतर आरबीआयने ही माहिती प्रसारीत केली आहे.

हा मोडस ऑपरेंडीचा प्रकार
ग्राहकांना फसवणुकीचा हा एक मोडस ऑपरेंडीचा प्रकार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यामध्ये कॉल, एसएमएस आणि ईमेलद्वारे ग्राहकांची माहिती मागवली जाते. ग्राहकांची माहिती मिळताच फसवणूक करणारे लोक ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब करतात. अशा परिस्थितीत, जर कधीही बँक संदर्भात माहिती द्यायची असेल तर ती बँकेत जाऊन किंवा बँकेंच्या संकेतस्थळावर जाऊन भरावी. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण कधीकधी बँकांच्या वेबसाइट सारख्या वेबसाईटच्या लिंकही शेअर केल्या जातात. म्हणून या सर्व प्रकारला बळी पडण्यापासून सावध रहा असे आरबीआयने म्हटले आहे.

अनेक संस्था वेळोवेळी सल्ला देतात
आरबीआय, विमा नियामक आयआरडीएआय, बाजार नियामक सेबी आणि अनेक बँका ग्राहकांना वेळोवेळी अशा सल्ला देत असतात. ग्राहकांनी त्यांचे बँक तपशील, डिमॅट खाते किंवा विमा पॉलिसी माहिती किंवा इतर कोणतीही माहिती संबंधित संस्थांमार्फतच द्यावी. विशेष म्हणजे बँक खात्याची वैयक्तिक माहिती जसे पिन किंवा पासवर्ड किंवा कार्ड तपशील बँका कधीच विचारत नाही असे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...