आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय:भारतीय स्टार्टअपमध्ये प्रतिभेची कमतरता ठरले मोठे आव्हान

बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विस्ताराच्या पुढच्या टप्प्यावर असलेल्या देशांतर्गत स्टार्टअप्सना पात्र कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. सुमारे ७५ टक्के भारतीय स्टार्टअप्स अमेरिकेत व्यवसायाचा विस्तार करू पाहत आहेत. तंत्रज्ञान आधारित एक्स्पेन्शन मार्केटप्लेस अलारिस ग्लोबलने एका अहवालात सांगितले, सुमारे जवळपास तीन चतुर्थांश भारतीय स्टार्टअप्सनी यूएस मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु विविध कारणांमुळे ते अयशस्वी झाले.

परवडणारी क्षमता ही स्टार्टअपची मोठी ताकद भारताच्या सॉफ्टवेअर एज सर्व्हिस, फूड टेक, हॉस्पिटॅलिटी आणि मोबिलिटी कंपन्यांनी परवडणारे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसमुळे जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली. भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) मते भारतीय कंपन्यांनी कोरोना सुरू होण्यापर्यंत अमेरिकेत सुमारे १.७५ लाख कोटी रुपयाची गंुतवणूक करुन सुमारे १.२५ लाख रोजगार निर्माण केले.

बातम्या आणखी आहेत...