आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे लंपास:चोरट्यांकडून आठ जनावरे लंपास ; पशु मालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले

धाड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंबेफळ आणि सातगाव या दोन गावातून १२ जूनच्या मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यातील आठ जनावरे लंपास करत पोबारा केला आहे. या घटनेमुळे पशु मालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मागील आठवड्यात धाड भागात शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करत भामट्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. मागील काही वर्षापुर्वी सुध्दा असाच प्रकार परिसरात घडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे. कुंबेफळ येथील शिवाजी बाळाजी आघाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील दोन बैल तसेच सुखदेव म्हसाजी वाघ यांच्या दोन वासऱ्या, फकीरखाँ पठाण यांचा एक बैल, राजू वाघ यांचे दोन बैल तर सातगाव येथील गोपाल राजपूत यांची गीर जातीची गाय असे पशुधन चोरट्यांनी लंपास करून पोबारा केला आहे. या तक्रारीवरून धाड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. या भागात पशुधन चोरीच्या सतत घटना घडत असल्यामुळे या घटना पोलीस प्रशासनाला आवाहन करत आहे. धाड परिसरात आजपर्यंत अनेक चोरीच्या छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र एकाही घटनेची उकल करण्यास पोलिस प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...